(Photo Credits: Instagram)

आयसीसी (ICC) विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाने बांगलादेश (Bangladesh)  विरुद्ध 94 धावांनी विजय मिळवत आपला शेवट गोड केला आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 9 बाद 314 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशला 221 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना खास ठरला तो पाकिस्तानी अष्टपैलू शोएब मलिक (Shoaib Malik) साठी. पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आले आणि शोएबने निवृत्तीची घोषणा केली. ट्विटरद्वारे त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. (ICC CWC 2019: स्वप्नभंग! आयसीसी विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तान बाद)

दरम्यान शोएब हा भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिचा पती आहे. त्याच्या निवृत्तीनंतर सानिया भावून होत ट्विटरवर एक मेसेज लिहिला. शोएबबद्दल अभिमान व्यक्त करत सानियाने लिहिले, "प्रत्येक कथेला शेवट असतो. पण आयुष्यात प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात होत असते. गेली 20 वर्षे अभिमानाने तू तुझ्या देशासाठी खेळल आला आहेस. तू जे काही मिळवलेस आणि आज तू जो कोणी आहेस, त्याबद्दल मला आणि इझहानला (Izhaan) तुझा अभिमान आहे".

दरम्यान, शोएबने पाकिस्तानसाठी 287 एकदिवसीय सामन्यात 34.55 च्या सरासरीने 7 हजार 534 धावा केल्या आहेत. त्याने 9 शतके आणि 44 अर्धशतके झळकावली आहेत. तर 287 वनडेमध्ये 158 विकेट घेतल्या आहेत. त्याने 19 धावांमध्ये 4 विकेट घेतल्या. त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 2007 ते 2009 या कालावधी शोएब पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. शोएबने 1999 मध्ये वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर 2001 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.