ICC CWC 2019: स्वप्नभंग! आयसीसी विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तान बाद
पाकिस्तान क्रिकेट संघ | (Photo Credits: Twitter)

आयसीसी विश्वचषक 2019 (ICC Cricket World Cup 2019) मध्ये पाकिस्तानचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला आहे. आता कुठे आयसीसी वर्ल्डकप 2019 स्पर्धेला रंग भरु लागला आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. सेमीफायनल (Semi-finals) फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला बांग्लादेश (Bangladesh) क्रिकेट संघाला पराभूत करायचे होते. त्यासाठी पाकची टीम मोठ्या उत्साहाने मैदानात उतरली. परंतू, त्यांना बांग्लादेश संघाला पराभूत करता आले नाही. परिणामी पाकिस्तानी संघाला सेमीफायनलपर्यंतही पोहोचता आले नाही. संघ स्पर्धेतून बाद झाला.

पाकिस्तानने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत बांग्लादेशसमोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानला जर सेमीफायनलमध्ये आपले स्थान कायम ठेवायचे होते तर, पाकिस्तानला केवळ 7 धावांमध्ये बाग्लादेशला संघाला ऑल आऊट करायचे होते. पण, असे घडलेच नाही. त्यामुळे पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे न्यूजीलैंड क्रिकेट संघ (New Zealand national cricket team) आता अंतीम 4 संघांमध्ये पोहोचला आहे.

पाकिस्तानकडून इमाम-उल-हक याने 100 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी केली. त्याशिवाय बाबर आजम यानेही 96 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार ठोकले. बांग्लादेशकड-ून मुस्ताफिजुर रहमान याने सर्वाधिक 5 गडी बाद केले. त्याशिवाय मोहाद्देक हुसैन याने 3 आणि मेहेंदी हसन याने 1 गडी बाद केला.

एएनआय ट्विट

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने सामन्यापूर्वी 500 धावा ठोकण्याचा दावा केला होता. त्याने म्हटले होते की, या सामन्यात आम्ही 500 धावा करण्याचा प्रयत्न करु. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व काही करण्याचा आम्ही प्रयत्न करु. परंतू, आम्हाला वास्तव स्वीकारावेच लागेल. आता जर परमेश्वरानेच मनात आणले तरच चमत्कार होईल.