Ollie Robinson Comeback: रॉबिन्सन Sussex संघासाठी टी-20 सामन्यातून करणार पुनरागमन, वर्णद्वेषी ट्विट प्रकरणात ECB ने केली होती निलंबनाची कारवाई
ओली रॉबिनसन (Photo Credit: Twitter/EnglandCricket)

इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज ऑली रॉबिनसन (Ollie Robinson) हँपशायरविरुद्ध टी-20 सामन्यात ससेक्सच्या दुसर्‍या संघाकडून खेळण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याची माहिती काऊंटी संघाने सोमवारी दिली. रॉबिनसनबे यापूर्वी आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवण्यासाठी विश्रांती घेतली होती ज्यामुळे शुक्रवारी व शनिवारी ग्लॉस्टरशायर आणि हॅम्पशायर हॉक्स विरुद्ध ससेक्सच्या (Sussex) व्हिटॅलिटी ब्लास्ट सामन्यांना मुकावे लागले होते. ससेक्स यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले की, “हेन्री क्रोकोम्बे दुसर्‍या संघात ओली रॉबिन्सनबरोबर सामील होईल. गेल्या आठवड्यात थोड्या विश्रांतीनंतर ओली क्रिकेटमध्ये परतला.” इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केल्यावर गेल्या आठवड्यात रॉबिन्सनने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. (Ollie Robinson: आंतरराष्ट्रीय निलंबनानंतर ब्रिटिश क्रिकेटपटूने उचलले मोठे पाऊल, वर्णद्वेषी ट्विट प्रकरणानंतर क्रिकेटमधून घेतला ब्रेक)

दोन आठवड्यांपूर्वी लॉर्ड्स येथे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात ट्विटर पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर 27 वर्षीय रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले होते. रॉबिन्सनने 2012-13 मध्ये वर्णद्वेषी ट्विट केले होते, जे काहीदिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे ईसीबीने त्याला या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. ओलीने 10 वर्षांपूर्वी वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्वीट केले होते, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामुळे ईसीबीला टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडले. दरम्यान, किवी संघाविरुद्ध रॉबिन्सनने शानदार पदार्पण करत लॉर्ड्स कसोटी सामन्यात एकूण 7 विकेट्स घेतल्या. पण सामन्यादरम्यान सोशल मीडियावर त्याचे जुने ट्विट्स व्हायरल झाल्यावर इंग्लंड बोर्डाने त्याच्या विरोधात कारवाई केली.

दुसरीकडे, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शनिवारी सांगितले की ते रॉबिंसनच्या जुन्या लैंगिकतावादी आणि वर्णद्वेषी ट्विट समोर आल्यानंतर प्रत्येक खेळाडूंच्या सोशल मीडियाचा मागील गोष्टींकडे लक्ष देण्यासंबंधी पुनरावलोकन करेल आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देईल.