कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लोकप्रिय असेलली इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13वा हंगाम यंदा युएईत खेळवण्यात येत आहे. या हंगामा जोरदार सुरुवात झाली असून आतापर्यंत 3 सामने पार पडले आहेत. यावर्षी युएईत खेळवला जाणार आयपीएलच्या 13 हंगामामुळे स्पर्धकांपुढे मोठे आव्हान असून प्रत्येक संघ अधिक तयारी करताना दिसत आहे. दरम्यान, यंदाच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी प्रत्येक संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसत आहे. यातच कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलदेखील (Andre Russell) जोरदार तयारी करत आहे. नेट्समध्ये रसल उंच फटके खेळताना दिसला आहे. मात्र, याचवेळी रसलने मारलेला चेंडू कॅमेऱ्यावर जाऊन आदळला आहे. त्यामुळे कॅमेऱ्याचा चक्काचूर झाला आहे. कोलकाता नाईट राईडर्सच्या संघाने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटल हॅंडलवरून शेअर केला आहे.
आयपीएलच्या 13 व्या हंगामात मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात चेन्नईने, दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात दिल्लीने तर बंगळुरु विरुद्ध हैदराबाद सामन्यात बंगळुरुने विजय मिळवत धडाकेबाज सुरुवात केली आहे. आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना राजस्थान रॉयलच्या संघाशी होणार आहे. तसेच कोलाकाताच्या संघाने अद्याप कोणताही सामना खेळला नसून त्यांचा पहिला सामना 23 तारखेला मुंबई इंडियन्सचा संघाशी होणार आहे. हे देखील वाचा- RR Vs CSK, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर
कोलकाता नाईट रायडर्सचे ट्विट-
💥 Oh gosh! That’s SMASHED - wait for the last shot..#MuscleRussell warming up to his devastating best!
@Russell12A #KKRHaiTaiyaar #Dream11IPL pic.twitter.com/0NsOHJ2Pja
— KolkataKnightRiders (@KKRiders) September 21, 2020
आयपीएलच्या 12 व्या हंगामातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जला केवळ एका धावाने पराभूत करत ट्रिफी जिंकली होती. मात्र, यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच आयपीएलचे दोन किताब आपल्या नावे करणाऱ्या कोलाकाताचा संघ यावेळी अधिक ताकद झोकताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये होणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.