RR Vs CSK, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर

इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) 13व्या हंगामातील आज दोन मोठ्या संघात सामना होणार आहे. आयपीएलमध्ये आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ आणि आयपीएलच्या पहिल्या हंगामात ट्रॉफीवर नाव कोरणारा राजस्थान रॉयलचा संघ (RR Vs CSK) आमने सामने असणार आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघाने एक सामना खेळला असून राजस्थानचा संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. यामुळे राजस्थानच्या संघासमोर मोठ आव्हान असणार आहे. राजस्थानचा संघ बऱ्याच दिवसांपासून मैदानात सराव करत आहे. मात्र, लाईव्ह सामन्याचा प्रेशर वेगळाच असतो. भारतीय वेळेनुसार, आज 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना कायमच खडतर राहिला आहे, परंतु 2018 पासून आतापर्यंतच्या विक्रमाकडे नजर टाकल्यास दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत, त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा विजय मिळवला आहे. तर, राजस्थान रॉयल्सच्या संघाने एका सामन्यात विजय प्राप्त केला आहे. शारजाह स्टेडिअमवर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक फायदा मिळाला आहे. क्रिकइन्फोवर दिलेल्या माहितीनुसार, शारजाह स्टेडिअमवर एकूण 46 सामने खेळले गेले आहेत. ज्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 26 वेळा विजय मिळवला आहे. तसेच शारजाहचे मैदानातील पिच वेगवान गोलंदाजासाठी मदतगार आहे. या मैदानात 64 टक्के विकेट वेगवान गोलंदाजाने घेतली आहेत. हे देखील वाचा- SRH vs RCB, IPL 2020: कोहलीचा 'विराट' पराक्रम; एमएस धोनी, गौतम गंभीर, रोहित शर्मा यांच्या एलिट यादीत झाला समावेश

संघ-

राजस्थान रॉयल-

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वि जयस्वाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, ओशान थॉमस, अँड्र्यू टाय, डेव्हिड मिलर, टॉम कुर्रान, अनिरुद्ध जोशी , श्रेयस गोपाळ, रियान पराग, वरुण आरोन, शशांक सिंग, अनुज रावत, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे

चेन्नई सुपर किंग्ज-

एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), मुरली विजय, अंबाती रायडू, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगीडी, दीपक चहर, पियुष चावला, इम्रान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, सॅम कुरन, एन जगदीसन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतूराज गायकवाड, कर्ण शर्मा