IND vs ENG (Photo Credit - X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ सध्या विश्रांतीवर आहे. टीम इंडिया आता पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मैदानात उतरणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याचे (Team India Tour England) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय संघाला जून 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात भारत (India Natioanl Cricket Team) आणि इंग्लंड (England National Cricket Team) यांच्यात पाच सामन्यांची रोमांचक कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून हेडिंग्ले कसोटीने सुरुवात होणार आहे.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

पहिली कसोटी, हेडिंग्ले - 20 ते 24 जून 2025

दुसरी कसोटी, बर्मिंगहॅम – 2 ते 6 जुलै 2025

तिसरी कसोटी, लॉर्ड्स - 10 ते 14 जुलै 2025

चौथी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड – 23 ते 27 जुलै 2025

पाचवी कसोटी, ओव्हल - 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2025

इंग्लंडपासून राहवे लागणार सावधान 

इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला इंग्लिश संघापासून सावध राहावे लागणार आहे. याचे कारण भारतीय संघाचा विजय आहे. खरं तर, यावर्षी भारताने घरच्या मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला होता. अशा स्थितीत आता इंग्लंडला भारताला घरच्या मैदानावर अशीच चव द्यायला आवडेल.