ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया (India) आता न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध 24 जानेवारीपासून टीम इंडिया 5 टी-20, 3 वनडे आणि 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया 2 बॅचमध्ये न्यूझीलंडसाठी रवाना झाली आहे. टीम इंडियाच्या मर्यादित ओव्हर्सचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पोस्ट शेअर करून चाहत्यांना न्यूझीलंडच्या दौर्यावर जात असल्याची माहिती दिली. रोहितने शेअर केलेल्या या फोटोमध्ये कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, रिषभ पंत दिसत आहेत. रोहित व्यतिरिक्त अन्य खेळाडूंनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत. नवीन वर्षात भारताने एक टी-20, तर एक वनडे मालिका जिंकली आहेत. तर भारतीय सांघाचीही पहिली विदेशी मालिका असणार आहे. मात्र, या दौऱ्याआधी भारतीय संघासाठी वाईट बातमी म्हणजे सलामी फलंदाज शिखर धवनला दुखापत झाल्याने दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. (IND vs NZ 2020: भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातून शिखर धवन Out, बीसीसीआय लवकरच करणार बदली खेळाडूची घोषणा, वाचा सविस्तर)
'पुढचा स्टॉप: ऑकलंड, न्यूझीलंड!' असे कॅप्शन देत जसप्रीत बुमराहने ट्विटरवर फोटो शेअर केला. यामध्ये बुमराह सेल्फी घेत आहे, तर श्रेयस अय्यर,मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुलसमवेत पोज देत उभे आहे. उपकर्णधार रोहितनेही फोटो शेअर केला आणि लिहिले, 'न्यूझीलंडसाठी सज्ज'. पाहा:
जसप्रीत बुमराह
Next stop: Auckland, New Zealand! ✈ pic.twitter.com/R2qola6WS9
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) January 20, 2020
रोहित शर्मा
युजवेंद्र चहल
दरम्यान, शिखरऐवजी वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही दुखापत झाली आहे. दिल्ली आणि विदर्भात सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी मॅचवेळी इशांतला दुखापत झाली आहे. विदर्भाच्या दुसऱ्या इनिंगच्या पाचव्या ओव्हरला इशांतला दुखापत झाली. विदर्भाचा कर्णधार फैज फैजलला बॉलिंग टाकताना इशांत शर्मा घसरला आणि त्याच्या पावलाला दुखापत झाली.
असा आहे भारत-न्यूझीलंड टी-20 संघ
भारत टी-20 संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर.
न्यूझीलंड टी-20 संघ: केन विलियमसन (कॅप्टन), हामिश बेनेट, टॉम ब्रूस (चौथ्या-पाचव्या मॅचसाठी), कोलिन डि ग्रैंडहोम (पहिल्या ते तिसऱ्या मॅचपर्यंत), मार्टिन गप्टिल, स्कॉट कगेलीन, डेरेल मिशेल, कोलिन मुनरो, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, मिशेल सैंटनर, टिम सीफर्ट, इश सोढी आणि टिम साउदी.