
MI vs DC Match Weather Update: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 63 वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाईल. मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना आज बुधवारी 21 मे रोजी खेळला जाणार आहे. सध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल. त्याआधी अर्धातास टॉस होईल. प्लेऑफच्या शर्यतीच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा आहे. मुंबईतील सध्याचे हवामान पाहता, हा सामना वाया जाण्याची दाट शक्यता आहे. कारण पुढील काही दिवस मुबईत जोदराद पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत, जर सामना रद्द झाला तर काय होईल? हे पहाव लागले.
मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत 12 सामन्यांत 14 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे 12 सामन्यांत 13 गुण आहेत. जर सामना रद्द झाला तर मुंबईचे 15 गुण होतील आणि दिल्लीचे 13 गुण होतील. अशा परिस्थितीत, पंजाब किंग्ज विरुद्ध दोन्ही संघांचा सामना महत्त्वाचा ठरेल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ वरचढ ठरेल.
सामना रद्द झाल्यास प्रत्येकी 1 गुण मिळणार?
There is a high possibility of rain in the MI vs DC match on Wednesday. What if this match gets called-off and both teams get one point each.? Then who will qualify.?#MIvsDC #IPL2025 😁 pic.twitter.com/RyxMzALcHi
— Cricket Freak 🏏 (@Cric_Freak01) May 19, 2025
दिल्ली कॅपिटल्ससाठी 'करो या मरो'ची स्थितीत
दिल्ली कॅपिटल्स 'करो या मरो' अशा स्थितीत आहे. जर त्यांनी एकही सामना गमावला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. जर त्यांनी दोन्ही सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. पण जर वानखेडेवरील सामना वाया गेला तर दिल्लीला पंजाबविरुद्ध जिंकावे लागेल.
हवामान अंदाज
हवामान खात्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान पावसाची 85% शक्यता वर्तवली आहे. त्याशिवाय, सामना होईल की नाही याबद्दलही अनिश्चितता आहे.
दिल्लीची नजर पंजाबवर असेल
जर वानखेडेवरील सामना पावसामुळे रद्द झाला आणि दिल्लीने पंजाबविरुद्ध विजय मिळवला तर त्यांचे 14 सामन्यांतून 16 गुण होतील. या परिस्थितीत जर मुंबईने पंजाबला हरवले तर त्यांचे 17 गुण होतील. ते प्लेऑफमध्ये पोहोचेल. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. सोमवारी सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करल्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.