IPL 2020: एमएस धोनीचं टीम इंडियात कमबॅक आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून, टी-20 लीग यावर्षी रद्द झाल्यास काय होईल, घ्या जाणून
एमएस धोनी (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसारामुळे यंदा क्रिकेटच्या सर्व स्पर्ध पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भारतातील प्रसिद्ध टी-20 स्पर्धा इंडियन प्रीमिअर लीगही (Indian Premier League) 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात अली आहे. आयपीएलची (IPL) सुरुवात 29 मार्चपासून सुरु होणार होती, पण ही स्पर्ध आता पुढे ढकलण्यात आल्याने एमएस धोनीचं (MS Dhoni) पुनरागमन लांबणीवर गेले आहे. धोनी इंडियन प्रीमियर लीगमधून क्रिकेटच्या मैदानावर परतणार होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषकानंतर ब्रेक घेतल्यानंतर धोनी अनेक महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. 29 मार्चपासून आयपीएलची सुरुवात होणार होती आणि धोनीला पुन्हा क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्साहित होते. तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सुरक्षेला प्राधान्य देत असल्याने यावर्षी ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. (VIDEO: CSK ने आयपीएल कॅम्प बंद केल्यावर एमएस धोनी पोहोचला रांचीला, बॅडमिंटन खेळत केला सराव)

जर आयपीएल 2020 खरोखर रद्द झाले तर त्याचा भारतीय क्रिकेट संघात धोनीच्या पुनरागमनवर परिणाम होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकाविरूद्ध वनडे मालिकेसाठी संघ जाहीर करताना धोनीच्या नावावर चर्चा झालेली नाही आणि आयपीएलचा चांगला हंगाम असेल तरच तो निवडीस पात्र असल्याचे कळले आहे. “ही एक सोपी सरळ निवड बैठक होती आणि धोनी यावेळी (दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी) मोजण्यात येत नसल्यामुळे त्याच्या भविष्याविषयी औपचारिक चर्चा झालेली नाही,” बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले. “आयपीएल चांगला असेल तरच त्याच्याबद्दल चर्चा केली जाईल आणि फक्त तोच का, असे बरेच ज्येष्ठ आणि युवा खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील. जर त्यांनी चांगली कामगिरी केली तर त्यांचादेखील विचार केला पाहिजे. तर, आपण काही आश्चर्यकारक समावेश पाहू शकता," सूत्रांनी म्हणले.

मागील काही महिने क्रिकेट न खेळाने धोनीच्या कारकिर्दीबाबत म्हटले तर त्याच्यासाठी मार्ग संपला आहे का? आपण आधीच धोनीला अंतिम वेळी भारतीय जर्सीमध्ये पाहिले आहे? असे दिसते!