एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) रविवारी चेपाक स्टेडियमवर तयारी शिबीर स्थगित करण्याची घोषणा केली. यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी पोहचले. सीएसकेचा (CSK) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) ज्याचा क्रिकेट मैदानावर चाहत्यांकडून मोठ्या उत्साहाने वाट पहिली जात होती, तो ही रांचीला पोहचला. आता, सोशल मीडियावर रांचीमधील धोनीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात माजी भारतीय कर्णधार धोनी आयपीएलचं (IPL) शिबीर स्थगित झाल्यावर आपल्या घरी परतल्यावर काय करीत आहे याबद्दल सांगत आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूने आपले पाय पसरले आहे. शाळा, जिम, हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल्स सर्व बंद केली आहे, एवढेच नव्हे तर खेळाचे मैदानही ओसाड झाले आहेत. (कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर BCCI चं ऑफिस बंद; कर्मचाऱ्यांना दिल्या 'वर्क फ्रॉम होम'च्या सुचना)

आयपीएलच्या 13 व्या मोसमावरही कोरोना विषाणूचा परिणाम झाला असून 15 एप्रिलपर्यंत स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. धोनीही इतर खेळाडूंप्रमाणे त्याच्या घरी रांचीला पोहोचला असलातरी तो विश्रांती घेत नाही आहे. कोरोना विषाणूंपासून न घाबरता धोनी स्वत: च्या मस्त शैलीत दिसत आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओंपैकी एकामध्ये धोनी रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन खेळताना दिसला. धोनी बॅडमिंटन दुहेरी सामना खेळताना दिसला.

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये, 38 वर्षीय रांचीच्या चाहत्यांच्या उपस्थितीत धोनी मोटारसायकल चालवतानाही दिसला. त्याने त्यांच्या चाहत्यांना निराश केले नाही आणि त्यांच्यासोबत सेल्फीही क्लिक केल्या. कोरोना विषाणूमुळे क्रिकेटचे मैदान निर्जन झाले असले तरी धोनी आपल्या तंदुरुस्तीवर काम करणे विसरला नाही.

वर्ल्ड कप 2019 च्या उपांत्य फेरीनंतर धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो पुनरागमन करीत होता. त्याच्या त्वरित फलंदाजी पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे आता चाहत्यांची प्रतीक्षा लांबणीवर गेली आहे. दरम्यान, धोनीला खेळाच्या मैदानावर पाहणे आता अवघड दिसत आहे कारण आयपीएलचा 13 वा सत्रही रद्द होऊ शकेल अशी बातमी अंतर्गत भागांत ऐकायला मिळाली आहे.