2019 मध्ये 'हे' दिग्गज क्रिकेटपटू होऊ शकतात निवृत्त !
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Getty Images)

2018 हे वर्ष सरले आणि आपण नववर्षात पर्दापण केले. आता या नववर्षात नवं काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यंदाचे वर्ष हे वर्ल्डकपचे असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे भरते आले असेल. मात्र यंदा क्रिकेट विश्वात मोठे बदल होऊ शकतात. काही खेळाडूंसाठी हा शेवटचा वर्ल्डकप ठरु शकतो. त्यानंतर क्रिकेटविश्वातही हे हिरे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. तर पाहुया यंदा कोणकोणते खेळाडू निवृत्त होतील....

फैफ डु प्लेसी:

फैफ दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा संकेत त्याने यापूर्वीच दिला आहे. डु प्लेसी हा त्याच्या जबरदस्त धावांसाठी ओळखला जातो.

डेल स्टेन:

दक्षिण आफ्रिकेचा हा तेज गोलंदाज असून याच्या समोर भले भले फलंदाज घामाघूम होतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनफिट असल्या कारणाने तो टीममधून आत-बाहेर होत आहे. त्याचबरोबर 2019 मध्ये डेल स्टेन 36 वर्षांचा होईल. त्यामुळे यंदा डेलच्याही निवृत्तीची शक्यता आहे.

क्रिस गेल:

अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा क्रिस गेल हा वेस्ट इंडिजचा तगडा फलंदाज. संपूर्ण जगात याचा चाहतावर्ग मोठा आहे. 2019 चा वर्ल्ड कप हा गेलचा 5 वा वर्ल्ड कप असेल. त्याचबरोबर हा त्याचा शेवटचा वर्ल्डकपही ठरु शकतो. यंदा क्रिस गेल 39 वर्षांचा होईल.

एमएस धोनी:

2019 चा वर्ल्डकप हा भारतीय क्रिकेट संघाचा कूल कॅप्टन महेंद्र सिंग धोनीसाठी शेवटचा वर्ल्डकप ठरु शकतो. 2004 मध्ये धोनी पहिली मॅच खेळला आणि त्यानंतर सातत्याने खेळत त्याने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. 2014 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2019 मध्ये विराट सेनेतील हे '5' क्रिकेटपटू अडकतील विवाहबंधनात!

 उत्तम फलंदाज असण्याबरोबरच धोनी अतिशय चांगला विकेटकिपरही आहे. धोनी कर्णधार असताना भारताने टी 20 आणि आयसीसी वर्ल्डकपला गवसणी घातली. त्याचबरोबर भारतीय संघाने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या नावे केली. 2019 मध्ये 37 वर्षांचा होणाऱ्या धोनीचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो.

या चार दिग्गज क्रिकेटपटूंशिवाय इतर काही खेळाडूही यंदा निवृत्ती घेऊ शकतील.