 
                                                                 चाहते आणि कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सेल्फीविरांमुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी याला चक्क गवत आणि काटेरी झुडपातून स्टेजवर प्रवेश करावा लागला. हा प्रकार नागपूर येथील महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यन घडला. एसजीआय या संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या क्रिकेट अकादमीचे उद्घाटन करण्यासाठी धोनी नागपूरला मंगळवारी (२१ नोव्हेंबर) पोहोचला होता. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या धोनीला पाहायला चाहते आणि प्रेक्षकांची इतकी गर्दी झाली की, धोनीला मुख्य मर्गाने व्यासपीठापर्यंत पोहोचताच आले नाही. त्यामुळे आयोजकांनी त्याला व्यासपीठामागच्या गवत आणि काटेरी झुडपातून मार्ग काढत व्यासपीठापर्यंत पोहोचवले.
दरम्यान, व्यासपीठापर्यंत कसाबसा पोहोचलेल्या धोनीने कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर छोटेखणी भाषणही केले. पण, त्यानंतर धोनीची झलक टीपण्यासाठी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आणि प्रेक्षक अतूर झाले होते. पण, प्रसारमाध्यमांपेक्षा प्रेक्षक आणि हैशी सेल्फीवीरांनीच धोनीला गराडा घातला. त्यामुळे तेथे लोकांची झुंबड उडाली. त्यामुळे धोनीच्या सुरक्षा बाऊन्सर्सना लोकांना मागे सारावे लागले. पण, गर्दीच इतकी होती की, धोनीचे बाऊन्सर आणि उपस्थित लोक यांच्यात धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे नाराज झालेल्या धोनीने कार्यक्रम मध्येच सोडला आणि तो हॉटेलवर निघून गेला. आपले छोटेखणी भाषण संपताच धोनी अकादमीच्या मैदानावरही जाणार होता. मात्र, लोकांनी त्याला गराडा घातला. त्यामुळे अकादमीच्या मैदानावर धोनीचे जाणे राहूनच गेले. (हेही वाचा, धोनीची अफलातून कॅच ; निवड समितीला चोख उत्तर (Video))
एसजीआय या संस्थेमार्फत महेंद्रसिंह धोनी रेसिडेंशियल क्रिकेट अकादमी सुरु करण्यात आली आहे. ही अकादमी नागपूर येथील गायकवाड पाटील आंतरराष्ट्रीय शाळेच्या परिसरात सुरु करण्यात आली आहे. या अकादमीचे उद्घाटन एम एस धोनी यांच्या हस्ते झाले. पण, कार्यक्रमाचे नियोजन इतके ढिसाळ होते की, लोकांनी गोंधळ घातला. त्यामुळे मुळे नाराज झालेल्या धोनीने कार्यक्रम मध्येच सोडला आणि तो हॉटेलवर निघून गेला.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
