मॅथ्यू वेडने केले मायकेल जॅक्सनचे अनुकरण (Photo Credits: Twitter/ cricket.com.au)

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध बॉक्सिंग डे (Boxing Day) कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने कसे-तरी 'किंग ऑफ पॉप' माइकल जैक्सन (Michael Jackson) याच्या आयकॉनिक डान्स मूव्हची नकल केली. वेड 144 च्या धाव संख्येवर फलंदाजीसाठी आला आणि लगेच त्याला नील वॅग्नर (Neil Wagner) याचा सामना करावा लागला. दिवसाच्या सुरुवातीलाच किवी गोलंदाज आक्रमक भूमिकेत दिसले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 90 ओव्हरमध्ये 4 गडी गमावून257 धावा केल्या होत्या. पण, युवा सामन्यात एक क्षण आला ज्याने चाहत्यांना दिग्गज मायकल जैक्सनची (Michael Jackson) आठवण करुन दिली. ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेड याने फुल लेंथ चेंडूला सामोरे जाताना चुकून जॅक्सनच्या एका डान्स मूव्हचे अनुकरण केले. वेडच्या सर्जनशीलतेमुळे चाहत्यांनाही धक्का बसला आणि त्यांनी सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त केली. (AUS vs NZ 2nd Test: स्टीव्ह स्मिथ याचा डेड बॉलच्या निर्णयावरून अंपायरशी झाला वाद, किवी फॅन्सने केली हुटींग, पाहा Video)

Cricket.com.au ने ट्विटरवर जॅक्सनची संस्मरणीय डान्स मूव्ह आणि वेडने या मूव्हची नकल करतानाच्या फोटोचा कोलाज फोटो पोस्ट केले आणि चित्रांमध्ये फारसा फरक दिसत नव्हता. टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट यांनीही वेडला फलंदाजी करताना मुश्किलीत पडले आणि सामन्यात टाकलेला एक चेंडूने खेळाडूला इतका त्रास दिला आणि अखेरीस त्याला एका अव्यवस्थित स्थितीत नेले. यावरूनच सर्वांनी वेडच्या उभे राहण्याच्या स्थितीची आणि मायकल जैक्सनच्या डान्स मूव्हची तुलना केली. "वडे, तू ठीक आहेस काय? तू ठीक आहेस ना, वडे?," असे कॅप्शन देत क्रिकेट.कॉम.एयूने ट्विट केले.

मायकेल जॅक्सनचे डान्स मूव्ह आणि वाडेच्या उभे राहण्याच्या स्थितीने नेटीझन्सना दोघांमध्ये तुलना करण्यास भाग पाडले. तुम्हीही पाहा यूजर्सने कश्याप्रकारे केली दोंघांमध्ये तुलना:

या वेळी स्टम्पसमोर !!

नवीन नाव !!

मायकेल जॅक्सन कोण?

चाहते जॅक्सनची आठवत आहेत!!

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून एमसीजीवर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बोल्टने पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज जो बर्न्सला बाद केले. पण, मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांनी अर्धशतकांची नोंद केली. तथापि, दिवसाखेरीस दोन्ही संघ एकसारखे दिसले. आणि आता दोन्ही संघ दुसऱ्या दिवशी वरचढ राहण्याचा प्रयत्न करतील.