यंदाच्या क्रिकेट विश्वचषकमध्ये पावसाची दमदार बॅटिंग बघायला मिळाली. मँचेस्टर (Manchester) येथे खेळात असलेल्या भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) या सामन्यात पावसामुळे व्यत्य आला. अखेर प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडची धावसंख्या 211 धावांवर पोहोचलेली असतानाच सामना थांबवण्यात आला. अखेर बुधवारी हा सामना पार पडणार असल्याचं सांगण्यात आले. पण, तरीही आज होणाऱ्या सामन्यावर देखील पावसाचे संकट कायम आहे. सेमीफायनलचा मुख्य दिवस आणि राखीव दिवशी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. (IND vs NZ World Cup 2019 Semi-Final Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs NZ मॅच चा LIVE आनंद)

ब्रिटिश हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज देखील मँचेस्टरमध्ये ढगाळ वातावरण राहिल आणि हलका पाऊस देखील पडेल. पण महत्त्वाची बातमी म्हणजे टीम इंडियाला (Indian Team) फलंदाजी करण्यास मिळणार आहे. आणि विशेषतः या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागण्याची शक्यता अतिशय कमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या रिपोर्टनुसार आज केवळ 10 टक्के पावसाची शक्यता आहे. पण दुपारी 12च्या सुमारास आणि संध्याकाळी 5 च्या सुमारास हलका पाऊस पडू शकतो. पण तरीही पूर्ण 50 ओव्हर्सचा सामना होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेला भारत-न्यूझीलंड झालेला सामना 46.1 व्या ओव्हरनंतर थांबवण्यात आला होता. यावेळी न्यूझीलंडने 5 बाद 211 धावा होत्या. हाच सामना बुधवारी पुन्हा सुरु होईल. मंगळवारी खेळ ज्या ओव्हर आणि चेंडूवर थांवण्यात आला होता, तेथूनच तो पुन्हा सुरु होणार आहे. दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनल सामन्यात आज काय होणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. प्रथम फलंदाजी करताना केन विल्यमसन (Kane Williamson) यांने 67 आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांच्या नाबाद 67 धावांमुळे न्यूझीलंडने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला.