IND vs NZ World Cup 2019 Semi-Final Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs NZ मॅच चा LIVE आनंद

चाहते भारत-न्यूझीलंडमधील आयसीसी विश्वचषक सामना DD Sports वर लाईव्ह बघू शकतात. देशाचा बहुचर्चित रेडिओ चॅनेल प्रसार भरती स्पोर्ट्स (Prasar Bharti Sports) भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामन्याची लाइव कमेंट्री करणार आहे.

IND vs NZ World Cup 2019 Semi-Final Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs NZ मॅच चा LIVE आनंद

आयसीसी (ICC) विश्वचषकमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत (India) आणि न्यूजीलंड (New Zealand) यांच्यात लढत होत आहे. दोन संघातील सामना काळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे, उर्वरित सामना आज खेळली जाणार आहे. भारत-न्यूझीलंड मधील सामना मॅन्चेस्टर (Manchester) येथे खेळेल जाईल. भारत-न्यूझीलंडमधील सामना बघण्यासाठी हजारो प्रेक्षक मॅन्चेस्टरला पोहचले आहे. जे चाहते इंग्लंड ला जाऊन हा सामना बघण्यात असमर्थ आहे ते टीव्ही वर DD Sports वर या सामन्याचा आनंद लुटू शकतात. दरम्यान, देशाचा बहुचर्चित रेडिओ चॅनेल प्रसार भरती स्पोर्ट्स (Prasar Bharti Sports) भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामन्याची लाइव कमेंट्री करणार आहे. आपण प्रसार भारती च्या FM 106.40 मेगाहर्ट्ज वर जाऊन या सामन्याची कॉमेंटरी ऐकू शकतात. (भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी कुटुंबाची सिंगापूर ते लंडन रोड ट्रीप; 50 दिवस, 17 देश, पार केले 25 हजार किमी अंतर)

दरम्यान न्यूझीलंडनं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय घेतला. मंगळवारी सामना रद्द होण्याआधी न्यूझीलंड संघाने 46.1 ओव्हरमध्ये 5 बाद 211 धावा केल्या. सेमीफाइनलमध्ये पाऊस पडल्यास आयसीसीकडून सामन्यांसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला होता. त्यामुळे आजचा सामना 46.1 ओव्हरपासून सुरु होईल.

या मॅचमध्ये पहिले गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखले. पहिल्या 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा स्कोअर 27/1 एवढा होता. यानंतर मात्र, विलियमसनने आणि हेन्री निकल्स (Henry Nicholls) आणि मग रॉस टेलर (Ross Taylor) यांच्यासोबत न्यूझीलंडची इनिंग सावरली. निकल्स 28 रन करून आऊट झाला, तर केन विलियमसनने 67 रनची खेळी केली. टेलर नाबाद ६७ रनवर खेळत आहे. टेलरबरोबर टॉम लॅथम (Tom Latham) 3 रनवर नाबाद आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2019 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).