विराट कोहली, चेतेश्वर पुजारा (Photo Credit: Instagram)

कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झाले आहे. बीसीसीआयने (BCCI) आयपीएल देखील पुढील सूचना येई पर्यंत स्थगित केले आहेत. त्यामुळे, सध्या सर्व क्रिकेटपटू घरी कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. भारतात लॉकडाउनचा तिसरा सत्र सुरु झाला आहे. कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता सरकारने लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढवला आहे. लॉकडाउन दरम्यान जुना फोटो पोस्ट करून भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याला ट्रोल केले. विशेष म्हणजे पुजारानेही विराटने शेअर केलेल्या फोटोवर एक मजेदार प्रतिक्रिया दिली. "लॉकडाउननंतर (Lockdown) पहिले सत्र असे होईल..." विराटने मीम पोस्ट करून पुजाराची फिरकी घेतली. कोहलीने इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यात तो एका टेस्ट सामन्या दरम्यान स्लिपमध्ये फिल्डिंग करताना दिसत आहे. या फोटोमध्ये पुजारा देखील दिसत आहे. (विराट कोहली याला गोलंदाजी की जसप्रीत बुमराह समोर फलंदाजी? ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटू एलिस पेरी ने केली स्मार्ट निवड)

कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "लॉकडाउननंतर पहिले सत्र असेच होईल. मला आशा आहेपुजाराकी तू बॉल पकडण्यासाठी जाशील." या पोस्टवर प्रतिक्रिया देण्यासाठी पुजाराला वेळ लागला नाही आणि त्याने लगेचच एक मजेदार उत्तर दिले. त्याने लिहिले, "होय कॅप्टन, मी दोन्ही हातांनी पकडणार."

 

View this post on Instagram

 

First session after lockdown be like 👀 @cheteshwar_pujara I hope you will go for the ball pujji 😜😜

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

दुसरीकडे, भारतात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. संक्रमितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात संख्या 46 हजारांवर गेली आहे. या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगभर लॉकडाउनचे अनुसरण केले जात आहे. या लॉकडाउनमध्ये क्रिकेटर्स सोशल मीडियावर अधिक सक्रिय होताना दिसत आहे. लाईव्ह चॅट किंवा फोटो शेअर करून ते चाहत्यांना आपल्या लॉकडाउन जीवनाची माहिती देत आहेत. विराटही लॉकडाउनमुळे सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. या शिवाय त्याने पीएम-केअर्स फंडला देखील अज्ञात निधी दान केला. आणि वेगवेगळ्या मार्गाने तो लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्यांना मदतही करत आहे.