Mitchell Starc And Liam Livingstone (Photo Credit - X)

ENG vs AUS 4th ODI 2024: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची मालिका सुरू आहे, त्यातील चौथा सामना इंग्लिश संघाने 186 धावांनी जिंकला. कर्णधार हॅरी ब्रूकने संघासाठी 87 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. मात्र लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) संघासाठी हिरो ठरला, त्याने अवघ्या 27 चेंडूत 62 धावा केल्या. या वेळी लिव्हिंगस्टोनने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) धू धू धूतला. इंग्लंडविरुद्ध शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कच्या षटकात लिव्हिंगस्टोनने एकूण 28 धावा दिल्या. यादरम्यान स्टार्कच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला.

स्टार्कच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

लिव्हिंगस्टोनने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि अशा प्रकारे लिव्हिंगस्टोनने या षटकात एकूण 28 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनमुळेच स्टार्कच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची सर्वात महागडी ओव्हर टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम झाला. यापूर्वी हा विक्रम झेवियर डोहर्टीच्या नावावर होता, ज्यांनी 2013 मध्ये भारताविरुद्ध एका षटकात 26 धावा दिल्या होत्या. (हे देखील वाचा: ENG vs AUS 4th ODI 2024 Highlights: चौथ्या सामन्यात इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव, मालिकेत 2-2 ने बरोबरी; येथे पहा सामन्याचे हायलाइट्स)

सामन्याचा स्कोरकार्ड येथे वाचा

पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात प्रथम खेळताना इंग्लंडने 39 षटकात 312 धावा केल्या. संघाकडून कर्णधार ब्रूकने 87 धावा केल्या तर सलामीवीर बेन डकेटने 63 धावा केल्या. त्याच्याशिवाय यष्टीरक्षक जेमी स्मिथनेही 39 धावांची उपयुक्त खेळी खेळली. इंग्लंडने केलेल्या 33 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 126 धावांवरच ऑलआऊट झाला. संघाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 34 धावा केल्या. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्सने चार, ब्रेडन कार्सने तीन आणि जोफ्रा आर्चरने दोन गडी बाद केले.