आयसीसी (ICC) अंडर-19 विश्वचषकचा (World Cup) अंतिम सामना रविवारी (9 फेब्रुवारी) दक्षिण अफ्रिकेच्या पोचेफस्टरूममधील सेनवेस पार्क येथे खेळला जाईल. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून बांग्लादेशने (Bangladesh), तर भारताने (India) पाकिस्तानला (Pakistan) पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. सेमीफायनल सामन्यात भारताने पाकिस्तानला एकतर्फी सामन्यात 10 गडी राखून पराभूत केले. यानंतर बांग्लादेशने दुसर्या सामन्यात न्यूझीलंडचा 6 विकेटने पराभव करत फायनलमध्ये स्थान निश्चित केले. बांग्लादेश संघ पहिल्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहचला आहे, तर भारताने सलग तिसऱ्यांदा ही फेरी गाठली. भारताने ही स्पर्धा रेकॉर्ड 7 वेळा जिंकली आहे.(भारत अंडर-19 टीम ने कॉपी केला युजवेंद्र चहल-श्रेयस अय्यर यांचा व्हिक्टरी डान्स, पाहा Video)
भारत-बांग्लादेश अंडर-19 विश्वचषक फायनल दक्षिण आफ्रिकेच्या पॉचेफस्टरूममधील सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूमच्या मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता, तर नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 3 चॅनेलवर असेल. शिवाय, सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
भारत-बांग्लादेशमध्ये आजवर अंडर-19 स्पर्धेत एकूण 4 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 3 आणि बांग्लादेशने 1 सामना जिंकला आहे. एकूण बोलायचे झाले तर दोन्ही संघांमध्ये आजवर 23 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने 18 सामने जिंकले आहेत तर बांग्लादेशने केवळ तीन सामने जिंकले आहेत. दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते.
भारत अंडर-19 टीम: प्रियम गर्ग (कॅप्टन), आकाश सिंह, अथर्व अंकोलेकर, शुभांग हेगड़े, यशसवी जयस्वाल, ध्रुव जुरेल, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटिल, रवि बिश्नोई, शशवत रावत, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, सिद्धेश वीर, दिव्यांश जोशी.
बांग्लादेश अंडर-19 टीम: परवेज हुसैन इमोन, तनजिद हसन, महमुदुल हसन जॉय, तौहीद हृदॉय, शहादत हुसैन, अकबर अली (कॅप्टन आणि विकेटकीपर), शमीम हुसैन, रकीबुल हसन, शॉरीफुल इस्लाम, तनजिम हसन शाकिब, हसन मुराद.