KWK 6 Controversy: लोकपालांसमोर हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांनी मांडली आपली बाजू ; वर्ल्ड कपमधील स्थानाबाबत लवकरच होईल निर्णय
Hardik Pandya, Karan Johar & K. L. Rahul (Photo Credits: Instagram)

कॉफी विथ करण (Koffee with Karan) या टीव्ही शो मधील बेताल वक्तव्यानंतर क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (K. L. Rahul) यांना आज लोकपाल डी. के. जैन यांच्या समोर सादर करण्यात आले. यावेळी दोघांनीही आपली बाजू मांडली. त्यानंतर दोघांचीही सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच यावर निर्णय दिला जाईल, असे लोकपाल डी. के. जैन यांनी सांगितले. प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत लोकपाल जैन यांसदर्भात रिपोर्ट सादर करतील.

ANI ट्विट:

जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'कॉफी विथ करण' या शो च्या वादग्रस्त एपिसोडनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या हार्दिक पांड्या आणि के.ए. राहुल यांना परत बोलवण्यात आले होते. त्यानंतर दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. कालांतराने त्यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लोकपालांची नियुक्ती केली होती. यानंतर लोकपाल डी. के. जैन यांनी दोघांनीही नोटीस बजावली होती. याबद्दल जैन यांनी सांगितले की, "हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल यांना आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे."