भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि के.ए. राहुल (KL Rahul) यांच्या मागची संकटं काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 6' (Koffee with Karan 6) या शो मध्ये महिलांबद्दल केलेली बेताल वक्तव्ये त्यांच्या चांगलीच अंगाशी आली आहेत. आता या संदर्भातील चौकशी बीसीसीआयने लोकपाल डी. के. जैन यांच्याकडे सोपवली आहे.
कॉफी विथ करण 6 या शोमधील महिलांवरील वादग्रस्त विधानांनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कालांतराने त्यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आले. मात्र आता या प्रकरणाची कसून चौकशी होणार असून त्यासाठी उच्च न्यायालयाने लोकपालांची नियुक्ती केली आहे. Koffee with Karan 6 मधील वादग्रस्त वक्तव्यांनंतर हार्दिक पंड्या, केएल राहुल आणि करण जोहर यांच्याविरोधात जोधपूर येथे गुन्हा दाखल
या संदर्भातील बैठक आज (गुरुवार, 7 मार्च) होणार आहे. प्रशासक समितीचे नवे सदस्य रवी थोडगे, विनोद राय आणि डायना एडुल्जी हे आजच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. यावर प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले की, "लोकपालांच्या नियुक्तीनंतरची ही पहिलीच बैठक असून यात अन्य मुद्यांवरही चर्चा होणार आहे." तसंच या बौठकीत भारत-पाकिस्तान मुद्यावरुन बीसीसीआयने आयसीसीला लिहिलेले पत्र आणि त्यावर आयसीसीचे उत्तर यावर चर्चा होणार आहे. शिवाय लवकरच सुरु होणाऱ्या आयपीएलवरही चर्चा होईल.