Koffee with Karan 6 मधील वादग्रस्त वक्तव्यांनंतर हार्दिक पंड्या, केएल राहुल आणि करण जोहर यांच्याविरोधात जोधपूर येथे गुन्हा दाखल
KL Rahul, Hardik Pandya and Karan Johar (Photo Credits: Twitter)

लोकप्रिय निर्मिता दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण 6 (Koffee with Karan 6) या टॉक शो मध्ये भारताचे ऑलराऊंटर क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी लावलेली उपस्थिती त्यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे. या शो मध्ये महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर हार्दिक पंड्या आणि केएल राहुल या दोघांचेही दोन एकदिवसीय सामन्यातून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता राजस्थानमधील जोधपूर येथे करण जोहर सहीत या दोघांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Koffee With Karan 6 मधील हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या बेताल विधान वादावर करण जोहरची प्रतिक्रीया)

जोधपूरच्या लूनी पोलिस स्थानकात या तिघांविरुद्ध  तक्रार दाखल करण्यात आली आहे. लुनी येथे राहणाऱ्या डी.आर. मेघवाल यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी FIR दाखल केली आहे. 'ओव्हर रिअ‍ॅक्ट करू नका' - हार्दिक पंड्या-केएल राहुलच्या बेताल वक्तव्याप्रकरणी राहुल द्रविडची प्रतिक्रिया

हे सर्व प्रकरण सुरु असताना हार्दिक पंड्या आणि केएल राहुल दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते. मात्र तेथून दोघांनाही परत बोलवण्यात आले आणि ऑस्ट्रेलिया, न्युझीलंडमध्ये होणाऱ्या सामन्यांत खेळण्यात त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. त्याऐवजी विजय शंकर आणि शुभमन गिल यांना संघात स्थान देण्यात आले. या प्रकरणी दोघांनीही माफी मागितली असून त्यांच्यावरील बंदी काढण्यात आली आहे. दोघांचेही संघात पूर्नरागमन झाले आहे.