हार्दिक पांड्या, राहुल द्रविड़ (Photo Credits: File Image)

कॉफी विथ करण सीझन 6 (KWK 6 Controversy) च्या काऊचवर बेताल वक्तव्य करणं भारतीय खेळाडू के एल राहुल (KLRahul)  आणि हार्दिक पंड्या (hardik Pandya) या दोन क्रिकेटर्सना चांगलीच भोवली आहेत. कॉफी विथ करण सीझन 6 मधील हा वादग्रस्त एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर इंटरनेटवर, सोशल मीडीयाच्या माधयमातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर हॉटस्टारवरून ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असलेला एपिसोड हटवण्यात आला असून दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड दौर्‍यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून खेळापासून या दोन खेळाडूंबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) याने 'ओव्हररिअ‍ॅक्ट' करणं टाळा असा सल्ला देत खेळाडूंचं काऊंसलिंग करणं गरजेचे असल्याचं म्हटलं आहे.

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीझन 6' मध्ये के एल राहुल आणि हार्दिक पंड्या या भारतीय क्रिकेटर्सनी सहभाग घेतला होता. त्यावेळेस स्त्रियांबददल, वैयक्तिक आयुष्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य या दोन्ही खेळाडूंकडून बाहेर पडली. त्यानंतर इंटरनेटवरूनही या कार्यक्रमासकट दोन्ही खेळाडूंवर टीका करण्यात आली. यानंतर बीसीसीआयकडून खेळाडूंवर कारवाई करताना त्यांना सध्या खेळापासून दूर ठेवण्यात आलं आहे. के एल राहुल आणि हार्दिक पंड्या या दोन्ही खेळाडूंच्या कोचच्या भूमिकेत असलेला माजी किक्रेटपटू राहुल द्रविड याने युवा खेळाडूंना समजावून सांगून त्यांचं काऊंसलिंग करून खेळावर लक्ष्य देण्याची गरज असल्याचं समजावून सांगितलं पाहिजे. हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांची IPL मधील खेळण्याची संधी हुकणार?

ड्रेसिंग रूममध्ये सीनियर खेळाडूंकडून त्यांच्या अनुभवातून काही गोष्टी उमद्या खेळाडूंनी शिकण्याची गरज असल्याचं राहुल म्हणाला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये बीसीसीआयची पुढील सुनावणी 25 जानेवारी दिवशी होणार आहे. सीओएने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये एक लोकपाल आयुक्त करावा आणि त्याच्या पडताळणीनंतर खेळाडूंना नेमकी काय शिक्षा करावी याचा निर्णय घ्यावा.