Kusal Mendis (Photo Credit: Getty Image)

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुशाल मेंडिस (Kusal Mendis) याला श्रीलंकन पोलिसांनी अटक केली आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. कुशाल मेंडिसच्या वाहनाने एका 64 वर्षीय व्यक्तीला धडक दिली आहे, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. कोलंबो नजदीकच्या पानादुरा भागात रविवारी सकाळी घडला आहे. दरम्यान, कुशाल मेंडिस यान मद्यपान केले होते का? याचीही चौकशी श्रीलंकन पोलीस करत आहे. आज दुपारी किंवा सोमवारी कुशाल मेंडिस मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले जाणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघात मृत पावलेला 64 वर्षीय व्यक्ती हा स्थानिक रहिवासी असून तो सायकलपटू असल्याचे कळत आहे. रविवारी रविवारी सकाळी कोलंबो जवळील पानादुरा भागात हा अपघात घडला आहे. अपघातानंतर या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याने अखरेचा श्वास घेतला. श्रीलंकन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कुशाल मेंडिसला अटक केली आहे. मेंडीस दारुच्या नशेत गाडी चालवत होता का याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. याप्रकरणी कुशाल मेंडिसला रविवारी दुपारी किंवा सोमवारी मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले जाणार असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Guru Purnima 2020: गुरु पौर्णिमा दिनी सचिन तेंडुलकर ने शेअर केला खास व्हिडीओ; मानले 'या' तीन गुरूंचे आभार (Watch Video)

ट्वीट-

कुशाल मेंडिस हा श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू मानला जातो. कुशाल मेंडिसने आतापर्यंत 44 कसोटी सामने आणि 76 एकदिवसीय सामने तर, 26 टी-20 सामने खेळले आहेत. कुशाल मेंडिसने आतापर्यंत 44 कसोटी आणि 76 एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे.