केन विलियमसन (Photo Credit: Alex Davidson/Getty Images)

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स (Lords) मैदानावर आज आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचा विजेता ठरणार आहे. यजमान इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात विश्वचषकमधील फायनल सामना सुरु आहे. न्यूझीलंड कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकत पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptil) 19 धावांवर बाद झाला. क्रिस वोक्स (Chris Woakes) याने गप्टिलला बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. दरम्यान, आजच्या सामन्यात किवी कर्णधार विलियमसनने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने (Mahela Jayawardene)याला मागे सारत विश्वचषकमध्ये इतिहास लिहिला आहे. (ENG vs NZ World Cup 2019 Final मॅचआधी जोफ्रा आर्चर ने उघडकीस केले यशाचे रहस्य- बार्बाडोसच्या स्मशानभूमीत करायचा गोलंदाजीचा सराव)

एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनण्याचा मान पटकावला आहे. विलियमसनने इंग्लंच्या 10 व्या ओव्हरमध्ये एकेरी धाव काढत यंदाच्या विश्वचषकमधील आपल्या धावांची संख्या 549 नाबाद केली. जयवर्धनेने 2007 च्या विश्वचषकमध्ये 11 सामन्यामध्ये 548 धावा केल्या होत्या. योगायोगाने, दोन्ही कर्णधारांनी संघांना विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मार्गदर्शन केले होते.

एक विश्वचषक स्पर्धेत कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावा:

केन विलियमसन - 201 9 मध्ये 549 *

महेला जयवर्धने - 2007 मध्ये 548

रिकी पॉन्टिंग - 2007 मध्ये 539

अॅरॉन फिंच - 201 9 मध्ये 507

तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ अंतिम फेरीत पोहोचले असून यंदाची अंतिम लढत ही ऐतिहासिक अशी ठरणार आहे. वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासात 29 वर्षानंतर अशी फायनल होणार आहे ज्यातून क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळेल. या दोन्ही संघांनी आतापर्यंत विश्वचषक जिंकलेला नाही.