Video: शिखर धवन याची पूत्र जोरावर याच्यासोबत मस्ती, मुलाने केला वडिलांच्या डोक्यावर लत्ताप्रहार
शिखर धवन मुलासह (Photo Credits: Instagram)

दुखापतीनंतर दिल्लीच्या रणजी संघात पुनरागमन करणारा भारतीय सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सोशल मीडियावर स्वतःच्या कुटूंबासह मस्ती केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेसाठी सोमवारी जाहीर झालेल्या टीम इंडियामध्ये धवनची निवड करण्यात आली आहे. धवनने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धवन आपला मुलगा जोरावर (Zoravar) यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. टीम इंडियामध्ये निवड झाल्यावर शिखर सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. आणि यामध्ये त्याने शतकी खेळी करत दुखापतीतून पुनरागमन केले. पण, याआधी शिखरने हा व्हिडिओ शेअर त्याच्या चाहत्यांना एक खास ट्रीट दिली आहे. या व्हिडिओमध्ये शिखरचा मुलगा त्याच्या खांद्यावर चढून मस्ती करत आहे. (श्रीलंका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी शिखर धवन, जसप्रीत बुमराह टीम इंडियात सामिल; रोहित शर्मा, मोहम्मद शमी यांना टी-20 साठी विश्रांती)

हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझा मुख्य प्रशिक्षक मला खेळण्यासाठी प्रवृत्त करत आहे. गब्बरलाफक्त छोटा गब्बरच मारू शकतो.' धवन पुढे लिहिले, 'माझी पत्नी (आयशा) आणि जोरावर भारतात राहण्यास येत आहेत. मी माझ्या कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी मी खूप आनंदी आहे.' धवनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये मुलगा झोरावार शिखरला लाथा मारताना दिसत आहे.

वर्ष 2019 साली धवन दुखापतींशी झगडला होता पण आता त्याने जोरदार पुनरागमन केले आणि रणजी ट्रॉफी सामन्यात हैदराबादविरुद्ध दिल्लीचे नेतृत्व करत आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेदरम्यान धवनला गुडघ्यात दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याला 25 टाके पडले होते. याच कारणामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या टी-20 आणि वनडे मालिकेलाही मुकावे लागले होते. पण, आता नवीन वर्षी तो पुनरागमन करण्यास सज्ज आहे.