India National Criket Team vs New Zeland National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारी (16 ऑक्टोबर) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालवर (Yashasvi Jaiswal) असतील. या सामन्यात यशस्वी जैस्वालला इतिहास रचण्याची संधी आहे. यशस्वी जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती. (हे देखील वाचा: IND vs NZ 1st Test Live Update: बंगळुरू कसोटी सामन्याला सकाळी सकाळी पावसाची हजेरी, नाणेफेकील उशीर)
अशी कामगिरी करणारा ठरु शकतो पहिला भारतीय
यशस्वी जैस्वालने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 929 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत जर त्याने पहिल्या सामन्यात 71 धावा केल्या तर 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय ठरेल. यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 8 सामन्यांच्या 15 डावात 50.92 च्या सरासरीने 662 धावा केल्या आहेत.
2024 मध्ये केवळ एका फलंदाजाने कसोटीत केल्या 1000 धावा
2024 मध्ये फक्त एकाच फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जो रूट असे या फलंदाजाचे नाव आहे. जो रूट यंदा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने 12 सामन्यांच्या 21 डावात 65.68 च्या सरासरीने 1248 धावा केल्या आहेत. या वर्षी त्याने 5 शतके आणि 4 अर्धशतकेही केली आहेत. या यादीत श्रीलंकेचा युवा फलंदाज कमिंडू मेंडिस दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 943 धावा केल्या आहेत.
2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
जो रूट (इंग्लंड) 1248
कामिंदू मेंडिस (श्रीलंका) 943
यशस्वी जैस्वाल (भारत) 929
बेन डकेट (इंग्लंड) 791
ओली पोप (इंग्लंड) 745