Year Ender 2023: हे वर्ष संपायला फक्त एक दिवस उरला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले आहे. जर आपण फलंदाजीचा विचार केला तर रोहित शर्मासाठी 2023 हे वर्ष खूप चांगले गेले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) अनेक मोठ्या मालिकाही जिंकल्या आहेत. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसीच्या (ICC) दोन मोठ्या स्पर्धा गमावल्या आहेत. टीम इंडियाला डब्ल्यूटीसी फायनल (WTC Final 2023) आणि आयसीसी विश्वचषक 2023 च्या (World Cup 2023) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एक डाव आणि 32 धावांनी दणदणीत पराभव स्वीकारुन वर्षाचा शेवट केला.
आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये सलग 10 सामने जिंकले होते. पण टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड कप 2023 मध्ये 125.94 च्या स्ट्राइक रेटने 597 धावा केल्या. तर विराट कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. (हे देखील वाचा: Year Ender 2023: टीम इंडियासाठी आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा पुन्हा वाढली, कसे होते भारतीय क्रिकेटसाठी 'हे' वर्ष; एका किल्कवर घ्या जाणून)
2023 मध्ये रोहित शर्माची कामगिरी
Format | Inn | Runs | Avg | 50/100 |
Test | 13 | 545 | 41.92 | 2/2 |
ODI | 26 | 1255 | 52.29 | 9/2 |
IPL | 16 | 332 | 20.75 | 2/0 |
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल जेतेपदांवर कब्जा केला होता. हार्दिक पांड्या कर्णधार बनल्यानंतर चाहते प्रचंड संतापले आहेत. हार्दिक पांड्याने यापूर्वी दोन मोसमात गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे. या काळात हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सला एकदा आयपीएलचे विजेतेपदही मिळवून दिले आहे.