IPL 2021: ‘नव्या विजेत्याचा पाया रचला गेला आहे’, RCB vs DC मधील रोमांचक लढतीनंतर Ravi Shastri ने केली मोठी भविष्यवाणी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

IPL 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवार, 27 एप्रिल रोजी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) थरारक 1 धावेच्या विजयानंतर भारतीय संघाचे (Indian Team) प्रशिक्षक रवि शास्त्री  (Ravi Shastri) यांनी आयपीएलमध्ये (IPL) यंदा ‘नवीन चॅम्पियन उदय होऊ शकतो’ असे मत व्यक्त केले आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्सने आपला शानदार प्रदर्शन सुरू ठेवत अखेर एका धावाने सामना जिंकला. या विजयासह आरसीबीने (RCB) आयपीएल 2021 पॉईंट्स टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले असून त्यांना या स्पर्धेत आता त्यांनी सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या मोसमातील हा दुसरा पराभव ठरला आहे. आरसीबीने तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला (2009, 2011, आणि 2016), पण त्यांना एकदाही चॅम्पियनशिप जिंकता आलेली नाही. पंजाब किंग्जबरोबरच दिल्ली आणि बेंगलोर या दोन फ्रँचायझींनी आजवर आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. (DC vs RCB, IPL 2021: शिमरॉन हेटमायरची तुफानी खेळी व्यर्थ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा एका धावेने पराभव)

यादरम्यान, रविवारी सामन्यानंतर रवि शास्त्री यांनी एक ट्विट पोस्ट केले ज्यात त्याने विराट कोहली आणि रिषभ पंतचा फोटो शेअर केला. दिल्ली आणि बेंगलोर संघात झालेल्या सामन्यामुळे नवीन चॅम्पियन उदयास येण्याची आशा निर्माण झाली आहे, असेही त्यांनी कॅप्शन लिहिले. “काल रात्री चमकदार खेळ. संभाव्य नवीन विजेत्यासाठी पाय रचला गेला आहे #IPL2021,” शास्त्रींनीं फोटोला कॅप्शन दिले. सामन्याबद्दल बोलायचे तर अहमदाबाद स्टेडियमवर बेंगलोरने सामन्यात पहिले फलंदाजी केली. मुंबई खेळपट्टी इतकी चांगली पीच नसली तरी एबी डिव्हिलियर्सच्या शानदार नाबाद 75 खेळीच्या जोरावर आरसीबीने 171/5 अशी धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने सर्वतोपरीने प्रयत्न केले परंतु त्यांना फक्त एक धाव कमी पडली.

दिल्लीसाठी कर्णधार पंतने नाबाद 58 तर शिमरॉन हेटमारने केवळ 25 चेंडूत नाबाद 53 धावा ठोकल्या. आतापर्यंतचे सामन्यात दोन्ही संघ जोरदार कामगिरी करत आहेत जे पाहून या दोन्ही संघांपैकी एकाकडे यंदाची चॅम्पियनशिप जिंकण्याची दाट शक्यता दिसत आहे.