DC vs RCB, IPL 2021: शिमरॉन हेटमायरची तुफानी खेळी व्यर्थ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा एका धावेने पराभव
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 21) 22व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) केवळ एका धावांने पराभूत केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात हा सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बेंगलोरच्या संघाने दिल्लीसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीला केवळ 170 धावापर्यंत मजल मारता आली आहे. या विजयात बेंगलोरकडून एबी डिव्हिलियर्स आणि हर्षल पटेल यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यात आलेल्या बेंगलोर संघाची खराब सुरुवात झाली आहे. पॉवरप्लेमध्ये बेंगलोरला 2 बाद 36 धावा करता आल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने रजत पाटीदारसोबत 30 धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात आमित मिश्राच्या गोलंदाजीवर मॅक्सवेल 25 धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर डिव्हिलियर्सने फटकेबाजी केली. त्याने शेवटच्या षटकात डिव्हिलियर्सने मार्कस स्टॉयनिसला 23 धावा ठोकल्या. डिव्हिलियर्सने 42 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. यात 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. ज्यामुळे बेंगलोरच्या संघाला 20 षटकात 5 बाद 171 धावा करता आल्या आहेत. हे देखील वाचा- पॅट कमिन्सनंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रेट ली भारताच्या मादतीसाठी आला धावून, इतक्या लाखांची केली मदत

ट्विट-

या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीचा संघ डगमताना दिसला आहे. बेंगलोरच्या भेदक गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. परंतु, मैदानात आलेल्या शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार ऋषभ पंतने तुफान फटकेबाजी केली. मात्र, अखेरच्या षटकात 14 धावांची गरज असताना दिल्लीच्या संघाला 10 धावा करता आल्या. ज्यामुळे एका धावांनी त्यांचा पराभव झाला आहे.