मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) कोलकाता नाईट रायडर्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाबच्या या विजयाचा फायदा दिल्ली कॅपिटल्सला झाला आणि त्यांनी प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारा दिल्ली चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) नंतर हा दुसरा संघ आहे. आता प्लेऑफ साठीची शर्यत अतिशय रोचक झाली आहे. दिल्ली आणि चेन्नईनंतर आणखी दोन संघांना आयपीएलच्या प्लेऑफमध्ये (IPL Playoffs) पोहोचायचे आहे. इतर दोन संघ कोणते असू शकतात, जे अंतिम चारमध्ये पोहोचू शकतात याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. केकेआरला पराभूत करून पंजाब किंग्स आयपीएल (IPL) 14 च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जवळजवळ पूर्ण झाली आहे. त्यामुळे खरी लढत चौथ्या स्थानासाठी आहे. यासाठी 4 दावेदार रिंगणात आहेत. (IPL 2021 Points Table Updated: PBKS विरुद्ध पराभवानंतरही KKR चौथ्या स्थानावर कायम, पहा पंजाब किंग्सची स्थिती)

सनरायझर्स हैदराबाद यापूर्वीच प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्स सर्व 3 सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते. पंजाब किंग्सने उर्वरित दोन्ही सामने जिंकल्याने केकेआर  (KKR) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्रत्येकी एक सामना गमावतील अशी अपेक्षा करत असतील. राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे. पण जर त्यांनी आपले उर्वरित तीन सामने जिंकले तर त्यांनाही संधी मिळू शकते. RCB बद्दल बोलायचे तर आतापर्यंत त्यांनी 11 सामन्यांमध्ये 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे 14 गुणांसह ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर त्यांनी उर्वरित 3 सामन्यांमध्ये एकही सामना जिंकला, तर ते सहज प्लेऑफमध्ये पोहचतील. शुक्रवारी पंजाब किंग्जकडून झालेल्या पराभवामुळे केकेआरच्या प्लेऑफची शक्यता आव्हानात्मक बनली आहे. केकेआरला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील तर मुंबई व पंजाबने उर्वरित सामने जिंकणार नाहीत यासाठी ते अपेक्षित असतील. जर मुंबईने त्यांचे सर्व 3 सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील आणि केकेआर बाहेर पडेल.

शुक्रवारी खेळलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 5 गडी राखून पराभव केला. केकेआरने दिलेले 166 धावांचे लक्ष्य पंजाबने तीन चेंडू शिल्लक असताना गाठले. कर्णधार केएल राहुलने 67 धावांची शानदार खेळी केली तर सलामीवीर मयंक अग्रवालने 40 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 67 धावा केल्या.