आयपीएल 2021 नेट रन रेटसह पॉईंट्स टेबल (Photo Credits: File Image)

IPL 2021 Points Table Updated:  आयपीएल 2021 चे साखळी सामने आज संपले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सवर अंतिम चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 42 धावांनी सनरायझर्स हैदराबादवर मात करून आपला स्पर्धेचा शेवट गोड केला. हैदराबादवर या विजयासह मुंबईने गुणतालिकेत 14 गुण मिळवले आहेत. तथापि मुंबईचा नेट रनरेट कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा कमी असल्यामुळे मुंबई प्लेऑफ क्वालिफाय होऊ शकले नाहीत. अशा स्थितीत आपले प्लेऑफमध्ये कोणत्या संघाचा सामना कोणाशी होईल हे निश्चित झाले आहे. प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चार संघांमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज, रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स, विराट कोहलीचे रॉयल चॅलेंजर्स आणि इयन मॉर्गनच्या केकेआरचा समावेश आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली आणि चेन्नई आमनेसामने येतील. तर एलिमिनेट्समध्ये आरसबी आणि केकेआर संघात टक्कर होईल. (IPL 2021 Purple Cap List Updated: आयपीएल 2021 मध्ये पर्पल कॅप शर्यतीत सहभागी खेळाडूंची लिस्ट)

नेट रन रेटसह अपडेटेड आयपीएल 2020 पॉइंट्स टेबल

Rank Team Played Won Loss Draw Net Run-Rate Points
Q दिल्ली कॅपिटल्स 14 10 4 0 +0.481 20
Q चेन्नई सुपर किंग्ज 14 9 4 0 +0.455 18
Q रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 14 9 5 0 -0.140 18
4 कोलकाता नाईट राईडर्स 14 7 7  0 +0.587 14
5 मुंबई इंडियन्स 14 6 8 0 +0.116 14
6 पंजाब किंग्स 14 6 8 0 -0.001 12
7 राजस्थान रॉयल्स 14 5 9 0 -0.993 10
8 सनरायझर्स हैदराबाद 14 3 11 0 -0.545 6

मुंबई इंडियन्स सहाव्या आयपीएल विजेतेपदाच्या शोधात आहेत तर बेंगलोरसह पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाला आजवर एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ आहे आणि त्यांच्या नावावर पाच विजेते आहेत तर चेन्नई सुपर किंग्जने तीन जिंकली आहेत. केवळ कोलकाता नाइट रायडर्स (2012 आणि 2014), सनरायझर्स हैदराबाद (2016) आणि राजस्थान रॉयल्स (2008) विजेतेपद जिंकणारे इतर संघ आहेत. आता नाउमेद झालेल्या डेक्कन चार्जर्सने 2009 मध्ये जेतेपद जिंकले होते.