IPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला DCच्या Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर
आयपीएल 2021 पर्पल कॅप अपडेटेड लिस्ट (Photo Credit: File Image)

IPL 2021 Purple Cap Updated List: आरसीबीचा (RCB) वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या  (Harshal Patel) डोक्यावरील पर्पल कॅपसाठी गोलंदाजांमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) आवेश खान (Avesh Khan) पटेलच्या पर्पल कॅपपासून आता अवघ्या 3 विकेट दूर आहे. पटेलने 7 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या आहेत तर खानने 8 सामन्यात 14 विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या यादीतील दुसरे अधिक मजबूत केलं आहे. आवेशसोबत राजस्थान रॉयल्सचा क्रिस मॉरिस (Chris Morris) देखील पटेलला टक्कर देण्याच्या जवळ पोहचत आहे मॉरिसने 7 सामन्यात एकूण 14 गडी बाद केले आणि यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. याशिवाय, मुंबई इंडियन्सच्या (Mumai Indians) राहुल चाहरने 11 विकेट्स तर सनरायझर्स हैदराबादच्या राशिद खानने 10 गडी बाद करत अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान पटकावले आहे. (IPL 2021 Points Table Updated: रोमांचक सलामी सामन्यात विराट कोहलीची RCB गुणतालिकेत शीर्षस्थानी)

आयपीएल स्पर्धेच्या अखेर मोसमात सर्वाधिक विकेट आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे पर्पल कॅप (Purple Cap) आणि ऑरेंज कॅप देण्यात येते. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. आयपीएलच्या पहिल्या सत्रात, 2008 मध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर पहिल्या पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. तन्वीरने या मोसमात शानदार गोलंदाजी राजस्थान रॉयल्सकडून एकूण 22 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलचा पहिला सत्र राजस्थान संघाने जिंकले होते आणि त्यात सोहेलने मुख्य भूमिका बजावली होती.

Rank Player Team Matches Played Wickets
1 हर्षल पटेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 7 17
2 आवेश खान दिल्ली कॅपिटल्स 8 14
3 क्रिस मॉरिस राजस्थान रॉयल्स 7 14
4 राहुल चाहर मुंबई इंडियन्स 7 11
5 राशिद खान सनरायझर्स हैदराबाद 7 10

डेक्कन चार्जर्सकडून खेळताना आरपी सिंहने 2009 मध्ये पर्पल कॅप काबीज केली होती. यानंतर, 2010 मध्ये प्रग्यान ओझा यांनी पर्पल कॅप ताब्यात घेतला. 2011 मध्ये लसिथ मलिंगा, 2012 मध्ये मॉर्ने मॉर्केल, 2013 मध्ये ड्वेन ब्राव्हो, 2014 मध्ये मोहित शर्मा, 2015 मध्ये ड्वेन ब्राव्हो, 2016 मध्ये भुवनेश्वर कुमार, 2017 मध्ये भुवनेश्वर कुमार, 2018 मध्ये अँड्र्यू टाय आणि 2019 मध्ये इमरान ताहिरने पर्पल कॅप आपल्या नावे केली होती