Top 5 Best Catches in IPL History: उत्कृष्ट फिल्डिंग व झेल पकडून खेळाडूंनी बदलला सामना; आयपीएलच्या इतिहासातील 'हे' 5 हैराण करणारे कॅच पुन्हा पाहाच! (Watch Videos)
आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कॅच (Photo Credits: Twitter)

जगातील सर्वात मोठी टी -20 लीग, इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) आजवर 12 सीझन झाले आहेत आणि यात, त्याने चाहत्यांना सर्व काही पाहायला मिळाले आहे, जे क्रिकेट सामन्यात ते विचार करू शकतील, शेवटच्या बॉलवर संघाने विजय मिळवावा किंवा पराभवाच्या तोंडून विजय मिळवून सर्वांना चकित करणे. कोणत्याही क्रिकेट सामन्यात महत्व जितके गोलंदाज किंवा फलंदाजे असते, तेवढेच महत्व संघाचे क्षेत्ररक्षकाचे देखील असते जे उत्कृष्ट झेल घेऊन किंवा धावबाद कसून संघाला कठीण वेळी विकेट मिळवून देतात. आयपीएलमध्ये (IPL) केवळ फलंदाजी आणि गोलंदाजी नाही तर फिल्डिंगचीही तुफान चर्चा होते. आजवर आपण आयपीएलच्या इतिहासातही असे अनेक कॅच पाहिले (Best Catches in IPL History) आहेत, ज्यात फिल्डरने अविश्वसनीय झेल पकडून सर्वांना चकित केले. असे काही 5 जबदरस्त कॅच तुम्ही विसरला असाल तर आगामी हंगामापूर्वी ते पाहाच. (Most Centuries in IPL: क्रिस गेल ते विराट कोहली; आयपीएलमधील 5 धाकड फलंदाज ज्यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये केली सर्वाधिक शतकं, गाजवली संपूर्ण स्पर्धा)

असंख्य प्रसंगी, एक धावबाद किंवा कॅचमुळे गेम पूर्णपणे बदलला आहे. आयपीएल 2020चे काउंटडाउन सुरू आहे आणि मागील 12 वर्षातील हे कॅच जर आपण विसरला असाल तर एकदा पाहाच.

1. कीरोन पोलार्ड - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज 2019

कॅरेबियन अष्टपैलूने वानखेडे स्टेडियमवर सीमारेषेजवळ एका हातात कॅच घेऊन धोकादायक सुरेश रैनाला पॅव्हेलियनवर पाठवले. पॉवरप्लेच्या निर्बंधामुळे रैनाने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याच्यासाठी, पोलार्डने अविश्वसनीय एक हाती झेल पकडला आणि टीमला मोठी विकेट मिळवून दिली.

2. एबी डिव्हिलियर्स - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स 2018

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधाराने वेळोवेळी प्रतिकूल परिस्थितीत अशक्य असे काम केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (आरसीबी) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मॅच दरम्यान डी विलर्सने  फॉर्ममध्ये असलेल्या अ‍ॅलेक्स हेल्सला बाद करण्यासाठी बाऊंड्री रोपवर जबरदस्त झेल पकडला.

3. क्रिस लिन - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2014

लिनच्या या झेलमुळे कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठी विकेट मिळू शकली नाही परंतु अशक्य असा विजय विजय मिळवून दिला. शेवटच्या तीन चेंडूंमध्ये आरसीबीला सहा धावांची आवश्यकता होती आणि एबी डिव्हिलियर्स खेळपट्टीवर होते. त्याने चौथ्या बॉलमध्ये जोरदार शॉट मारला जो षटकार जाणार असे दिसत होते, पण लिनने असामान्य फिल्डिंगचे प्रदर्शन केले आणि सीमारेषेजवळ अविश्वसनीय झेल पकडला.

4. ट्रेंट बोल्ट - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2018

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने हर्षल पटेलच्या चेंडूला लेग-साईडमध्ये हवेत चेंडू मारला जो षटकार जाणार असे दिसत होते. तथापि, ट्रॅन्ट बोल्टने सीमारेषेजनळ जबरदस्त कॅच घेतला. हा अद्भूत कॅच पाहून दर्शकही हैराण झाले. किंबहुना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज स्वतः देखील चकित झाला.

5. फाफ डू प्लेसिस - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स 2015

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या चेन्नई विरुद्ध मुंबई हाय-व्होल्टेज चकमकीदरम्यान आयपीएलमधील डु प्लेसिसने एक उत्तम झेल पकडला. आशिष नेहराच्या चेंडूवर किवी अष्टपैलू कोरी अँडरसनचा मोठा फटका कनेक्ट करण्यात अयशस्वी ठरला, पण फिल्डर नसलेल्या ठिकाणी चेंडू जाणारा असे दिसत होते तथापि, डु प्लेसिसने उडी मारली आणि उडता कॅच घेतला.

आयपीएलचा नवीन हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आहे आणि चाहते यंदा देखील अनेक जबरदस्त कॅच पाहण्यासाठी सज्ज आहेत. खेळाडू युएईला पोहचून कसून सराव करत आहे आणि चाहत्यांना मनोरंजक स्पर्धेचे अनुभव देण्यासाठी सज्ज होता आहेत.19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाईल.