Most Centuries in IPL: क्रिस गेल ते विराट कोहली; आयपीएलमधील 5 धाकड फलंदाज ज्यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये केली सर्वाधिक शतकं, गाजवली संपूर्ण स्पर्धा
क्रिस गेल आणि विराट कोहली फाइल फोटो (Photo Credits: IANS)

टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणे अवघड काम असते, परंतु आजवर अधिकाधिक फलंदाज तीन आकृतीचा आकडा गाठण्यास सक्षम झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) पहिल्याच सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमने (Brendon McCullum) 2008 मध्ये आश्चर्यकारक शतक ठोकले होते. मॅक्युलमने रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (Royal Challengers Bangalore) ही कामगिरी बजावली. त्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत मागील 12 वर्षात शतकी कामगिरी बजावली आणि प्रत्येक डाव अविस्मरणीय ठरला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतकं (Most Centuries in IPL) ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज क्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहे. भारतीय कर्णधार-फलंदाज म्हणून ओळखल्या जाणारा विराट कोहलीच्या नावावर पाच आयपीएल (IPL) शतकं आहेत आणि गेलच्या मागे दुसर्‍या क्रमांकावर आहेत. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन आणि डेविड वॉर्नर यांनी आयपीएलमध्ये प्रत्येकी चार शतकं ठोकली आहेत आणि क्रमवारीत संयुक्तपणे तिसर्‍या क्रमांकावर आहेत. (IPL 2020 Most Expensive Captain: आयपीएल 13 मध्ये 8 संघांची धुरा सांभाळणार 'हे' खेळाडू, जाणून घ्या कोणाला मिळतात सर्वाधिक पैसे)

अ‍ॅडम गिलक्रिस्ट, वीरेंद्र सेहवाग आणि ब्रेंडन मॅक्युलमसह सात खेळाडूंनी दोन शतके ठोकली आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकूण 34 क्रिकेटपटुंनी शतक नोंदवले आहे. सलामी फलंदाज आणि टॉप ऑर्डर फलंदाज नेहमीच याबाबतीत वर राहिले, अशीही उदाहरणे आहेत की काही खेळाडूंनी खालच्या स्थानावर येऊन विरोधी टीमवर 'हल्ला बोल' केला. गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब अशा दोन वेगवेगळ्या संघांसाठी 125 सामन्यांत तब्बल सहा शतके केली आहेत. आयपीएल 2013 मध्ये आरसीबीकडून खेळताना गेलने सर्वाधिक वैयक्तिक टी-20 धावा, 66 चेंडूंत नाबाद 175, केल्या आहेत. दुसरीकडे, आयपीएलमध्ये विराट कोहलीने केलेल्या पाच शतकांपैकी चार शतक एकट्या आयपीएलच्या 2016 च्या आवृत्तीत केले. भारतीय फलंदाज म्हणून कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकली आहेत. येथे आपण पाहूया आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा फलंदाज:

आयपीएलमधील सर्वाधिक शतके

फलंदाज सामने 100s सर्वोच्च स्कोअर
क्रिस गेल 125 6 175 नाबाद
विराट कोहली 177 5 113
डेविड वॉर्नर 126 4 126
शेन वॉटसन 134 4 117 नाबाद
एबी डिव्हिलियर्स 154 4 113 नाबाद

 

 

2019 च्या आयपीएल आवृत्तीत शतकांची संख्या सहा होती जी 2018 आयपीएलच्या तुलनेत एक जास्त होती. आयपीएल 2020 आपल्यासाठी यंदा संयुक्त अरब अमिरातीच्या फलंदाजी अनुकूल परिस्थितीत काय आणते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इंडियन प्रीमियर लीगची 13 वी आवृत्ती 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल.