IPL 2020 Update: 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान होऊ शकते इंडियन प्रीमियर लीग 13चे आयोजन, सूत्रांची माहिती
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: Getty/Facebook)

बीसीसीआय अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या (BCCI Apex Council) शुक्रवारी झालेल्या बैठकीत इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 13 चे आयोजन 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) करण्यासाठी सर्व एकमत झाले. यंदा 29 मार्च पासून सुरु होणारे आयपीएल भारतात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. मात्र, बीसीसीआय सप्टेंबर-नोव्हेंबर विंडो दरम्यान या लीगचे आयोजन करण्याच्या प्रयत्नात होते आणि याच्या तंतोतंत तारखाही समोर आल्या आहेत. आणि भारतात कोरोनाचा आकडा 10 लाख पार केला असताना युएई एक आदर्श ठिकाण म्हणून समोर येत आहे. ESPNCricinfo च्या अहवालानुसार भारतीय बोर्ड 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान युएई येथे आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे आयोजन करू शकते. यापूर्वी, 2014मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे पहिले 20 सामने युएईच्या अबू धाबी, दुबई आणि शारजाह स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, आगामी टी-20 वर्ल्ड कपबाबत आयसीसीच्या निर्णयानंतर बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल असे समजले जात आहे. (IPL 2020 Update: चार्टर्ड विमानांची बुकिंग, हॉटेलांची निवड; आयपीएल फ्रँचायझींनी सुरु केली परदेशवारीची तयारी)

ऑक्टोबर 18 ते नोव्हेंबर 15 दरम्यान ऑस्ट्रेलिया येथे टी-20 विश्वचषकचे आयोजन होणार आहे, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यंदा शक्य नसल्याचे म्हटले आहे. अशा स्थितीत आयसीसी काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 20 जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर आयसीसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. या अहवालात पुढे म्हटले आहे की, बीसीसीआयने भारत सरकारला या स्पर्धेला युएईमध्ये हलविण्यास परवानगी मिळावी म्हणून पत्र लिहिले आणि संघातील खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी आवश्यक प्रवास परवानगी मिळवी.

बीसीसीआयने यापूर्वी त्यांची प्रथम प्राथमिकता भारतातील स्पर्धेचे आयोजन करणे असेल परंतु परिस्थिती सुधारत नसल्यास ते देशाबाहेर स्पर्धा आयोजित करण्यास ते संकोच करत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. शिवाय, भारतात कोरोना प्रकरणे चिंताजनक दराने वाढत असताना आयपीएलची परदेशवारी पक्की असल्याचे दिसत आहे. 29 मार्च ते 17 मे दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेच्या तेराव्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी युएई आघाडीवर आहे. शुक्रवारी, बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलने संपूर्णपणे यूएईमध्ये आयपीएल खेळल्या जाण्याच्या शक्यतेवर चर्चा केली.