आयपीएल (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर भारतासह (India) जगभरात सुरू आहे. कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड-19 संदर्भातील देशातील सद्यस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाप्त होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये 3 मे पर्यंत वाढ केली आहे. लॉकडाऊनमुळे यंदाच्या आयपीएलच्या (IPL) होण्याच्या आशा अपेक्षा हळू हळू संपत चालल्या आहेत. दरम्यान, बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांकडून पुढील बातम्या येईपर्यंत आयपीएल रद्द करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. यापूर्वी आयपीएल 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले होते. कोरोनासंबंधीची परिस्थिती लवकरच सुधारली नाही तर बीसीसीआय सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात आयपीएल आयोजित करू शकते. जे छोट्या स्वरूपात खेळले जाऊ शकते. तथापि, या बातम्यांविषयी फक्त अफवा आहेत आणि बीसीसीसीआयने याबाबत औपचारिक विधान आले नाही. (IPL 2020 स्थगित होण्याच्या मार्गावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवल्याने टूर्नामेंटच भविष्य निश्चित)

यंदाचा आयपीएल 50 दिवसांऐवजी 44 दिवसांत खेळला जाणार आहे. स्पर्धेचे सर्व 8 संघ 9 शहरांमध्ये 14-14 सामने खेळतील. याखेरीज, दोन सेमीफायनल, 1 बाद फेरीची आणि 24 मे रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानावर अंतिम सामना रंगणार होता. परंतु बीसीसीआय आता 2009 च्या पार्श्वभूमीवर त्याचे प्रारूप 37 दिवसांनी कमी करु शकते. यापृवी, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सध्याच्या स्थितीत आयपीएलचे आयोजन होणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले होते. आयपीएल ही जगभरातील सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या टी-20 लीगपैकी एक आहे आणि जगभरातील अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेत भाग घेण्याचे इच्छूक असतात. बरीच खेळाडूंना यातून प्रसिद्धी आणि धन, दोन्हींचा लाभ मिळाला आहे. युवा खेळाडूंना येथून मिळणार अनुभवी शानदार असतो.

बीसीसीआय बुधवारी 15 एप्रिल रोजी किंवा येत्या काही दिवसात लीग स्थगित केले जाण्याची घोषणा करू शकते. आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार होता, परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे टूर्नामेंट 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली.  भारतात 21 दिवसांच्या लॉकडाउनचा आज, 14 एप्रिलला शेवटचा दिवस होता. दरम्यान, पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले आणि लॉकडाउन कालावधी वाढविला. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउन 19 दिवसांनी वाढवून 3 मे पर्यंत केले आहे.