विराट कोहली,  एबी डिव्हिलियर्स (Photo Credit: IANS)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) मधील प्रसिद्ध फ्रॅन्चायसींपैकी एक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांनी काल त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट-ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून प्रोफाइल फोटो आणि पोस्ट्स हटवल्या आहे. यासह त्याने आपले नावही 'बदलले' आहे. यामुळे फक्त त्यांचे चाहतेच नव्हे तर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ही आश्चर्यचकित झाला आहेत. कोहली सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. आरसीबीच्या (RCB) या कृतीने विराटला चिंतेत टाकले आहे. टी-20 मालिकेत मिळवलेल्या जबरदस्त विजयानंतर वनडे मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर कोहलीसाठी हे सर्वात मोठे झटका आहे. आरसीबीचे सदस्य युजवेंद्र चहल यानेही ट्वीट करून यामागचे कारण विचारले. . दुसरीकडे, कर्णधार कोहलीनेही याबाबत ट्वीट करत आश्चर्य व्यक्त केले आहे. कोहलीने गुरुवारी ट्वीट करून लिहिले की, "पोस्ट अदृश्य होतात आणि कर्णधाराला माहिती दिली जात नाही. @rcbtweets तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास मला कळवा." (IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रॅन्चायसीचं बदलणार नाव? आरसीबीने फोटो आणि नाव बदल्यावर चकित युजवेंद्र चहल ने विचारला 'हा' प्रश्न)

विराटला आरसीबीच्या (RCB) या कारवाईबद्दल कोणतीही पूर्व सूचना असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आरसीबी फ्रॅन्चायसी एक नवीन नाव आणि लोगोसहआगामी आयपीएलमध्ये खेळेल असे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आरसीबी आपल्या नावात बंगलोरच्या ऐवजी बंगळुरू करणार आहे असे वृत्त समोर आले. आरसीबी 16 फेब्रुवारी रोजी याबाबत घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यानेही आश्चर्य व्यक्त केले आणि हे सर्व एक रणनीती अनुसार केल्याची आशा व्यक्त केली. "@Rcbtweets वर फोल्क्स, आमला सोशल मीडिया खात्यांचे काय झाले? हे फक्त एक रणनीती असल्याची आशा आहे,"डिव्हिलियर्सने ट्विटरवर लिहिले.

विराटचे ट्विट

डिव्हिलियर्सचे ट्विट

आरसीबीने आजवर खेळल्या 12 मोसमात एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आले नाही. मात्र, 2009 आणि 2011 आरसीबीला उपविजेतेपदावर संतोष मानावे लागले. या वर्षी अंतिम सामन्यात आरसीबीला अनुक्रमे डेक्कन चार्जर्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता. तर, 2020 साठी बंगळुरूने अ‍ॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, वरुण चक्रवर्ती, केन रिचर्डसन, जोश फिलिप यांचा समावेश आहे. दरम्यान, नाव आणि लोगो बदलून फ्रॅन्चायसीचे भाग्य बदलते की नाही हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.