रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: IANS)

विराट कोहली याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Banglore) फ्रॅन्चायसी इंडियन प्रीमिअर लीगच्याआ (Indian Premier League) गामी 13 व्या मोसमात नवीन नावासह प्रवेश करेल. बुधवारी त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील नाव आणि प्रोफाइल फोटो बदलले. याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही आरसीबीचे (RCB) नाव बदलण्यात आले आहे. त्यामुळे, आरसीबी आगामी मोसमाआधी आपले नाव बदलेल असे म्हटले जात आहे. आपले मूळ नाव बदलून आरसीबीने ‘रॉयल चॅलेंजर्स’ असे अकाउंटचे नाव ठेवून फोटो आणि कव्हर पिक्चर काढून टाकले. हिंदुस्थान टाइम्समधील एका वृत्तानुसार 16 फेब्रुवारी रोजी आरसीबी त्यांच्या टीमच्या नावासह ‘बेंगळुरू’ नाव जोडेल. कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि क्रिस गेल यांसारखे प्रसिद्ध खेळाडू असूनही आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकता आलेले नाही. कोहलीने त्या सात मोसमात संघाचे नेतृत्व केले आहे.

दरम्यान, आरसीबीच्या या कृतीनंतर त्यांचे चाहतेच नव्हे तर टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ही आश्चर्यचकित झाला. न्यूझीलंड दौऱ्यावरून मायदेशात परत येत चहलने ट्विट करुन लिहिले, "अहो आरसीबी, ही गुगली काय आहे?" तुमचा प्रोफाइल फोटो आणि इन्स्टाग्राम पोस्ट कोठे गेले?" कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरू फ्रॅन्चायसीने ट्वीटरचे नाव बदलल्याने सर्व आश्चर्यचकित झाले आहे. पाहा आरसीबीच्या पोस्टवर चहलची प्रतिक्रिया:

अहवालानुसार बंगलोर टीम नाव बदलून बंगळुरू करणार आहे आणि हा मोठा बदल 16 फेब्रुवारी रोजी होऊ शकतो. यासह टीमचा नवीन लोगोही लाँच करेल. जर संघाच्या नावात बदल झाला तर आरसीबीचे नशीबही बदलते की नाही आणि ते पहिले जेतेपद जिंकतात की नाही हे पाहणे उत्साहाचे ठरेल. या वेळी आरसीबी संघात डेल स्टेन, क्रिस मॉरिस, आरोन फिंचसारखे खेळाडू खेळताना दिसतील.