RCB vs MI, IPL 2019: रोहित शर्मा याचा मुंबई इंडियन्स विरुद्ध विराट कोहली याचा रॉयल चॅलेंजर्स; जबरदस्त सामन्याची पर्वणी
IPL 2019, RCB vs MI | (Photo Credits-file photo)

इंडियन प्रमीमियर लीग (Indian Premier League 2019) अर्थातच आयपीएल 2019 (IPL 2019) च्या 12 व्या पर्वातील सातव्या सामन्यामुळे बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium in Bengaluru) आज क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाने उसांडून जाईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) असा सामना आज (28 मार्च 2019) या स्टेडीयमवर रंगत आहेत. आजच्या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे आयपीएलच्या सुरुवातीला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आज पुन्हा एकदा मैदानात आहे. त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला कशी टक्कर देतो याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाबाबत बोलायचे तर, अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा याचे पुन्हा एकदा मुंबई संघात पुनरागमन झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे श्रीलंका क्रिकेट (एसएलसी)ने आगोदरच स्पष्ट केले आहे की, जर विश्वचषक खेळायचा असेल तर, श्रीलंकेच्या खेळाडूंनी देशातील प्रादेशिक संघांमधून खेळले पाहिजे. श्रीलंगा क्रिकेट प्रशासनाच्या निर्णयानंतर मलिंगा याने मुंबईच्या सुरुवातीच्या सहा सामन्यांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे आग्रह धरलाहोता की, त्यांनी मलिंगा याला शक्य तितके आयपीएल सामने खेळण्याची संधी द्यावी. बीसीसीआयच्या सूचनेचा आदर करत श्रीलंका क्रिकेटने ही मुभा दिली.

एकदिवसीय सामन्यातील सर्वश्रेष्ट फलंदाज विराट कोहली आणि सर्वश्रेष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल सामन्यांमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या दोघांवर नजर नाही टिकली तरच नवल. दुखापतीचा यशस्वी सामना केलेला जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यासाठी मैदानावर उपस्थित आहे. बुमराह याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई संघ काहीसा चिंतेत होता. (हेही वाचा, IPL 2019: दुखापतग्रस्त Adam Milne च्या ऐवजी मुंबई इंडियन्स संघात Alzarri Joseph ला स्थान)

पराभवाचे उट्टे काढत संघाने नवी लय आत्सात करावी यासाठी रोहित शर्मा प्रयत्नशील असेल यात शंका नाही. गेल्या सामन्यावेळी युवराज सिंह याने 53 धावांची खेळी केली होती. मात्र, संघातील इतर खेळाडंची कामगीरी तितकी म्हणावी अशी झाली नव्हती. दुसऱ्या बाजूला बंगळुरुच्या संघालाही नामुष्कीजनक पराभावाचा सामना करावा लागला होता. चेन्नई सुपर किंग्ज संगाविरुद्ध आपल्या पहिल्याच सामन्यात बंगळुरुचा संघ 70 धावांनी पराभूत झाला होता.

मुंबई इंडियंस : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, बेन कटिंग, मिशेल मॅकलेनगन, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, रसिख सलाम, युवराज सिंह, सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डि कॉक (विकेटकीपर)

रॉयल चैलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डि विलियर्स, कॉलिन डी ग्रँडहोम, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, नवदीप सैनी, टिम साउथी, युजवेंद्र चहल,गुरकीरत सिंह मान , शिवम दुबे, शिमरोन हेटमेयर