IPL 2019: दुखापतग्रस्त Adam Milne च्या ऐवजी मुंबई इंडियन्स संघात Alzarri Joseph ला स्थान
Mumbai Indians (Photo Credits: File Photo)

आयपीएल 2019 मध्ये आज (28 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) असा सामना रंगणार आहे. मात्र आजच्या होणाऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर अल्जारी जोसेफ (Alzarri Joseph) याला संघात स्थान देण्यात आले आहे. एडम मिल्न (Adam Milne) याला दुखापत झाल्याने त्याच्याऐवजी अल्जारी जोसेफ याला टीममध्ये सहभागी करुन घेतले आहे.

मुंबई विरुद्ध बंगलोर हा आजचा सामना बंगलोर येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगणार आहे. यापूर्वी दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 37 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजचा सामना मुंबईसाठी महत्त्वाचा असणार आहे.

तर दुसरीकडे बंगलोर संघाला देखील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. चेन्नईने अवघ्या 70 धावांत बंगलोर संघाला माघारी परतवले होते आणि 7 गडी राखत बंगलोरवर विजय मिळवला होता.