IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स संघाचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 7 गडी राखून दणदणीत विजय
आज झालेल्या आयपीएलच्या पहिल्या टी20सामन्यात चैन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 7 गडी राखत पराभव केला.
आज (23 मार्च) चेन्नई (Chennai) येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) रंगलेल्या आयपीएलच्या (IPL 2019) पहिल्या टी20 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (Royal Challengers Bangalore) 7 गडी राखत पराभव केला. या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र बंगलोरची सुरुवात अडखळत झाली. हरभजन सिंगच्या फिरकी गोलंदाजी समोर बंगलोरचे प्रमुख फलंदाज विराट कोहली, मोईन अली आणि एबी डिव्हीलिअर्स टिकाव धरु शकले नाही. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी दोन-तीन गडी बाद करत अवघ्या 70 धावांमध्ये बंगलोरचा डाव गुंडाळला. भारतासह जगभरात कोणत्या TV चॅनल्सवर पाहाल IPL सामने? घ्या जाणून
अवघ्या 71 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईला केवळ 8 धावांत पहिला झटका बसला. त्यांचा सलामीवीर शेन व्हॉटसन याला युजवेंद्र चहलने शून्य धावात माघारी परतवले. परंतु, त्यानंतर संयमाची खेळी करत अंबाती रायडु आणि सुरेश रैना यांनी चेन्नईचा डाव सावरला. रायडुने 2 चौकार आणि 1 षटकारासह चेन्नईसाठी सर्वाधिक 28 धावा केल्या. चार षटकात केवळ 20 धावा देत बंगलोरचे 3 गडी बाद करणाऱ्या हरभजन सिंग 'मॅन ऑफ द मॅच' (Man Of The Match) ठरला.
.@ChennaiIPL beat Royal Challengers Bangalore by 7 wickets in the opening encounter of #VIVOIPL 2019.#CSKvRCB pic.twitter.com/ghDdVeF9PD
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2019
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स या संघाने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात चांगला खेळ करत आपली विजयी घोडदौड चालू ठेवली आहे. चेन्नईचा हा खेळ पाहता यावर्षीची चेन्नईची टीम प्ले-ऑफ्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2019 11:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

