IPL2019 starts from March 23 | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

IPL 2019, CSK vs RCB:  इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही स्पर्धा अखेर आजपासून (23 मार्च 2019) सुरु होत आहे. गेले प्रदीर्घ काळ क्रिकेट आणि क्रिडाप्रेमी या स्पर्धेकडे डोळे लाऊन बसले होते. शनिवारी सायंकाळी 7 वाजता आयपीएल स्पर्धेच्या 12 व्या पर्वातील पहिला सामना सुरु होईल. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कप्तान विराट कोहली (Virat Kohli) यांच्या नेतृत्वाखाली चैन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) हे दोन सामने स्पर्धेच्या सलामीला मैदानात उतरतील. महेंद्र सिंह धोनी सीएसके (CSK) अर्थातच चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणार आहे. तर, विराट कोहली हा आरसीबी (RCB) म्हणजेच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व करेन. दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्याची छाया आयपीएल सामन्यांवर असल्यामुळे यंदा आयपीएलची ओपनिंग सेरिमनी होणार नाही. या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नाही. दरम्यान, हे सामने तुम्ही भारतात प्रसारण होणाऱ्या विविध वाहिन्यांवरुन पाहू शकता.

गेल्यावर्षी आयपीएल प्रसारणाच्या हक्कासाठी लिलाव

गेल्यावर्षी आयपीएल प्रसारणाच्या हक्कासाठी लिलाव पद्धत आवलंबण्यात आली होती. ज्यात स्टार नेटवर्कने 16,347.50 कोटी रुपयांची सर्वाधीक बोली लावत IPL प्रसारणाचे हक्क स्वत:कडे घेतले होते. बीसीसीआय आणि स्टार नेटवर्क यांच्यात हा करार पाच वर्षांसाठी झाला होता. ज्यानुसार 2018 ते 2022 पर्यंत सर्व आयपीएल सामन्यांचे प्रसारण स्टार स्पोर्टवरच होईल.

भारतात कोणकोणत्या चॅनलवर होईल लाईव्ह प्रसारण?

प्राप्त माहितीनुसार, भारत, श्रीलंका, बांग्लादेश, भूतान, मालदीव आणि नेपाळ आदी देशांतील आयपीएल सामन्यांचे लाईव्ह प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्टकडे आहेत. त्यानुसार या देशांमध्ये आयपीएल प्रसारण स्टार स्पोर्ट 1, स्टार स्पोर्ट 3 वर केले जाईल. भारतात हे प्रसारण स्टार स्पोर्ट 1 हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये केले जाईल. तर, स्मार्टफोन युजर्स हे सामने हॉट स्टारवरही पाहू शकतात. (हेही वाचा, )

भारत सोडून इतर देशांतील IPL लाईव्ह प्रसारण

भारत वगळता जगभरातील इतर देशांमध्येही आयपीएल 2019 चे सामने थेट प्रक्षेपीत (लाईव्ह टेलीकास्ट) केले जाणार आहेत. हे प्रसारण आणि देश पुढील प्रमाणे: अमेरिका - विलो टीव्ही, युके - स्काई स्पोर्ट्स, दक्षिण अफ्रीका - सुपर स्पोर्ट्स, न्यूझिलंड - स्काई स्पोर्ट्स न्यूझिलंड, बांग्लादेश - चॅनल 9, अफगानिस्तान - लेमर टीव्ही, ऑस्ट्रेलिया - फॉक्स स्पोर्ट्स, कॅनडा - विलो टीव्ही. (हेही वाचा, IPL 2019 Full Schedule: 23 मार्च ते 5 मे दरम्यान रंगणार्‍या VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या कधी, कुठे रंगणार आयपीएलचे सामने)

पाकिस्तानात आयपीएल सामन्यांच्या प्रसारणावर बंदी

दरम्यान, पाकिस्तान या भारताशेजारी देशातही तुम्ही जिओ सुपरवर आयपीएल सामने पाहू शकता. परंतू, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमिवर पाकने आयपीएल 2019 च्या सामन्यांच्या प्रक्षेपणास बंदी घातली आहे.