Lasith Malinga (Photo Credits: IANS)

सध्या आयपीएल 12 (IPL 12) ची सर्वत्र धूम आहे. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या सामन्यात मुंबई संघाने 40 धावांनी दिल्ली संघावर विजय मिळवला. या सामन्यातील हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खेळीचे प्रचंड कौतुक होत आहे. कालच्या सामन्यात हार्दिक पांड्याने 15 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारत 32 धावा केल्या. तर धोनी प्रमाणे त्याने मारलेला हेलिकॉप्टर शॉट लक्षवेधी ठरला. इतकंच नाही तर फलंदाजी करताना दोन ओव्हर्समध्ये त्याने 17 धावा देत चांगली खेळी केली. त्यामुळे त्याला 'मॅन ऑफ द मॅच' (Man of the Match) चा किताब देखील मिळाला. किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)

हार्दिकच्या दमदार खेळीचे कौतुक खुद्द लसिथ मलिंगा याने केले आहे. मलिंगा म्हणाला की, "हार्दिक एक उत्तम फलंदाज आहे. तसंच तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मला त्याच्या समोर बॉलिंग करायला भिती वाटते. वर्ल्डकप मध्ये जर हार्दिकसमोर खेळायची वेळ आली तर खरंच कठीण होणार आहे. कारण मला माहित आहे कोणत्याही गोलंदाजाचा चेंडू टोलवण्याची त्याची क्षमता आहे."

पहा व्हिडिओ:

आयपीएलमधील 9 पैकी 6 सामने जिंकत 12 पॉईंटसह मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ 9 पैकी 5 सामने जिंकत 10 पाईंटसह तिसऱ्या स्थानावर आहे.