MI vs RCB, IPL 2019: किरॉन पोलार्ड याने डिव्हिलियर्स याला केलेल्या जबरदस्त रन-आऊटची सोशल मीडियात चर्चा (Watch Video)
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore (Photo Credits: File Photo)

MI vs RCB, IPL 2019: आयपीएल 12 सीजनमधील काल (15 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) या संघांत रंगलेल्या सामन्यात पुन्हा एकदा बंगलोर संघाला हार पत्करावी लागली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बंगलोर संघाने 7 गडी गमावत 171 धावा केल्या आणि मुंबईपुढे 172 धावांचे आव्हान ठेवले.

मुंबईच्या लसित मलिंगाची जबरदस्त गोलंदाजी आणि दमदार ओपनिंगसह हार्दिक पांड्याच्या धमाकेदार फलंदाजीच्या आधारावर बंगलोर संघावर 5 विकेट्सने मात करणे सोपे झाले.(आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विराट कोहली ह्याला 12 लाखांचा दंड)

मात्र या रंगलेल्या सामन्यात चर्चा झाली ती किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) डीव्हिलियर्सला (AB de Villiers) केलेल्या जबरदस्त रन-आऊटची. शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त फलंदाजीसाठी सज्ज असलेल्या डिव्हिलियर्सने पहिल्या चेंडूवर सिक्सर मारला. मात्र दुसरा चेंडू नीट खेळता न आल्याने चेंडू सीमारेषेवरील पोलार्डकडे गेला. पोलार्डने सीमारेषेवरूनच चेंडू फेकला आणि तो थेट स्टंपवर लागला. त्यावेळेस डिव्हिलियर्स रन घेण्यासाठी धावण्याच्या तयारीत होता. त्यामुळे तो क्रीजच्या बाहेर राहिला आणि रनआऊट झाला.

पहा व्हिडिओ:

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यांपैकी 7 सामने गमावले आहेत. तर मुंबई इंडियन्स  संघ 8 पैकी 5 सामने जिंकत स्पर्धेत तिसऱ्या क्रमांवर आहे.