IND Beat SL Asia Cup 2023 Final: आशिया कप 2023 च्या अंतिम (Asia Cup 2023 Final) सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव (India Beat Sri Lanka) केला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांना महागात पडला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) अप्रतिम गोलंदाजी करत 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले, तर दुसरीकडे हार्दिक पांड्याने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. (हे देखील वाचा: IND Beat SL Asia Cup 2023 Final: आशिया कपमधील शानदार विजयानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचे केले अभिनंदन, मोहम्मद सिराजचे केले भरभरून कौतुक)
पहा व्हिडिओ
टीम इंडियाने केला विक्रम
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 6.1 षटकात 51 धावा करत या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. इशान किशनने 18 चेंडूत 23 धावा आणि शुभमन गिलने 19 चेंडूत 27 धावा करत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. या विजयासह टीम इंडियाने भारताच्या वनडेतील सर्वात मोठ्या विजयाचा नवा विक्रम रचला. टीम इंडियाने 263 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा हा मोठा विजय ठरला.
पाच वर्षानंतर आठवा आशिया चषक जिंकला
यासह भारतीय संघाने पाच वर्षानंतर आठवा आशिया चषक जिंकला. टीम इंडिया हा आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या सामन्यात दोन्ही संघात अनेक बदल पाहायला मिळाले. तसेच अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदरचा भारतीय संघात समावेश होता.