IND Beat SL Asia Cup 2023 Final: आशिया कपमधील शानदार विजयानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचे केले अभिनंदन, मोहम्मद सिराजचे केले भरभरून कौतुक

आशिया चषकातील शानदार विजयानंतर माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर ट्विट केले आणि म्हटले की....

IND Beat SL Asia Cup 2023 Final: आशिया कपमधील शानदार विजयानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचे केले अभिनंदन, मोहम्मद सिराजचे केले भरभरून कौतुक

टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना (Asia Cup 2023 Final) आज कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा दहा गडी राखून पराभव करत आठव्यांदा आशिया कप विजेतेपदावर कब्जा केला. या सामन्यात श्रीलंकेचा एकही फलंदाज मोहम्मद सिराजच्या झंझावातापुढे टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या 50 धावांवर गारद झाला. आशिया चषकातील शानदार विजयानंतर माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर ट्विट केले आणि म्हटले की महान विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! श्रीलंका क्रिकेटसाठी खरोखरच कठीण दिवस. मोहम्मद सिराजचा अ‍ॅडव्हान्स स्पेल खूपच चांगला होता!

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2023 08:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).