IND vs BAN (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: बांगलादेशने भारताचा दुसऱ्या वनडे सामन्यात पराभव करुन (IND vs BAN 2nd ODI) मालिका आपल्या नावावर केली आहे. आता या मालिकेमध्ये 2-0 अशी बढत बांगलादेशने ठेवली आहे. सात वर्षानंतर बांगलादेशनेही मालिका आपल्या नावावर केली आहे. या आधी 2015 मध्ये बांगलादेशने भारतीय संघाला हारवुन मालिका जिंकली होती. आता या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करुन अनेक प्रमुख कारणे समोर आली आहे. पहिल्या सामन्यातील चुकीची पुनरावृत्ती भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही केली. एकवेळ बांगलादेशने 69 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. पण, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली आणि याचा फायदा घेत बांगलादेशने 271 धावा केल्या. मीरपूरच्या संथ विकेटवर ही धावसंख्या भारताला जड होती.

रोहित शर्माला दुखापत

दुसऱ्या सामन्यात श्रेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि तो पुर्ण इंनिग मैदानाबाहेर होता त्यामुळे कर्णधार म्हणुन ही मोहिम केएल राहुलला मिळाली. दुखापतीमुळे विराट कोहलीला धवनसोबत डावाची सुरुवात करावी लागली. पण, कोहली 5 धावा करून बाद झाला. आणि याचा फटका भारतीय संघाला मिळाला.

केएल राहुलने संभाळले कर्णधारपद

रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलने कर्णधारपद भूषवले. पण, बांगलादेशने झटपट 6 विकेट्स गमावल्यानंतर, त्याने बचावात्मक कर्णधारपद स्वीकारले आणि मेहदी हसन मिराज आणि महमुदुल्लाह यांच्यातील भागीदारी फुलू दिली. त्याने आक्रमणाचे क्षेत्र निश्चित केले नाही. त्याने गोलंदाजांना नीट फिरवले नाही. याचा फायदा घेत मिराज आणि महमुदुल्ला यांनी सातव्या विकेटसाठी 168 चेंडूत 145 धावा जोडून बांगलादेशला 271 धावांपर्यंत नेले. (हे देखील वाचा: Team India ला दुहेरी झटका, कर्णधार Rohit Sharma परतणार मायदेशी)

चांगली सुरुवात केल्यानंतर गोलंदाजांची झाली दिशाभुल

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजांकडून अपेक्षेप्रमाणे सुरुवात करून दिली. पहिल्या 10 षटकात बांगलादेशचा संघ केवळ 44 धावा करू शकला आणि त्याच्या दोन विकेट पडल्या. यानंतरही भारतीय गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी सुरूच ठेवली आणि पुढच्या 25 धावांत बांगलादेशच्या आणखी 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 69 धावांत 6 विकेट्स गमावल्यानंतर बांगलादेशचा डाव लवकरच संपेल असे वाटत होते. पण, येथे भारतीय गोलंदाजांनी गेल्या सामन्यातील चुकीची पुनरावृत्ती केली आणि लाईन लेंथपासून दूर गेले. याचा फायदा घेत बांगलादेशने शेवटच्या 31 षटकात 186 धावा केल्या.

डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजी

पुन्हा एकदा डेथ ओव्हरमध्ये खराब गोलंदाजी भारताच्या पराभवाचे कारण ठरली. बांगलादेशने शेवटच्या 10 षटकात 1 गडी गमावून 101 धावा जोडल्या. शेवटच्या 5 षटकांमध्ये बांगलादेशींनी अधिक आक्रमक फलंदाजी करत 68 धावा केल्या. ते भारताला भारी पडले.

फलंदाजांची खराब कामगिरी

भारताच्या पराभवाचे एक कारण म्हणजे आघाडीच्या फळीतील फलंदाजांची खराब कामगिरी. श्रेयस अय्यर (82), शिखर धवन (8), विराट कोहली (5), केएल राहुल (14) वगळता फक्त धावा करता आल्या. भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी अय्यर आणि अक्षर पटेल यांच्यात झाली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 101 चेंडूत 107 धावांची भागीदारी केली. याशिवाय मोठी भागीदारी नसल्याने भारताचे पारडे जड होते. दुखापतीनंतरही रोहित खेळायला आला आणि त्याने 28 चेंडूत नाबाद 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याला दुखापत झाली नसती तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.