Rohit Sharma Injured: टीम इंडियाने यापूर्वीच बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावली आहे. जणू हा पराभव पुरेसा नसताना दुहेरी आघाताची बातमीही त्याच्यावर आली. कॅप्टन रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) एक मोठे अपडेट समोर आले आहे. एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात तो खेळणार नाही. दुसऱ्या सामन्यात पाच धावांनी झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी सांगितले की, रोहित बांगलादेशात संघासोबत राहणार नाही, तर मुंबईला परतेल. रोहितच्या मुंबईत परतण्यामागचे कारणही त्याने सांगितले. राहुल द्रविडने सांगितले की, रोहित त्याच्या दुखापतीबाबत तज्ञाचा सल्ला घेण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी फ्लाइट पकडणार आहे. तसेच या सामन्यातुन दीपक चहरही बाहेर पडला आहे. दोन टेस्ट सामन्यात कर्णधार कोण राहणार यावरही आता प्रश्न उपस्थित होत आहे.
जाणून घ्या काय म्हणाले राहुल द्रविड
🗣️ 🗣️ Head Coach Rahul Dravid takes us through the injury status of captain Rohit Sharma, Deepak Chahar & Kuldeep Sen #TeamIndia | #BANvIND pic.twitter.com/r6CEj5gHgv
— BCCI (@BCCI) December 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)