आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) अंतिम सामना आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सात गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले आहे. हे दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडले. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला होता आणि आजच्या सामन्यात तोच पराभव भारताच्या पुन्हा पदरी पडला. तत्तपूर्वी, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया सघांने हा सामना 42 व्या षटकातच आपल्या नावावर केला आणि विश्वविजेता बनला.
1987 🏆 1999 🏆 2003 🏆 2007 🏆 2015 🏆 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ 🏆
𝙰𝚄𝚂𝚃𝚁𝙰𝙻𝙸𝙰 𝙰𝚁𝙴 #𝙲𝚆𝙲𝟸𝟹 𝙲𝙷𝙰𝙼𝙿𝙸𝙾𝙽𝚂 🎉 pic.twitter.com/QtzBty5Ewl
— ICC (@ICC) November 19, 2023
टीम इंडियाच्या पराभवाचे ठरले 'हे' तीन सर्वात मोठे कारण
भारताच्या पडल्या लवकर विकेट
प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने भारतासाठी चांगली सुरुवात करुन दिली पण त्याला ती साथ शुभमन गिलला देता नाही आली आणि 4 धावा करुन बाद झाला. त्यानंतर विराट आणि रोहित शर्मामध्ये चांगल्या भागीदारीची लय दिसुन येत होती पण आपल्या ताबडतोब फलंदाजीमुळे रोहित शर्मा खराब शाॅट खेळून 47 धावावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला तग धरून खेळता आला नाही, ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. टीम इंडियाच्या विकेट झटपट पडल्या, त्यामुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले.
ऑस्ट्रेलियाचे जबरदस्त क्षेत्ररक्षण
आज अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्याच षटकापासूनच शानदार क्षेत्ररक्षण केले आणि आपल्या क्षेत्ररक्षणामुळे संपूर्ण सामन्यात सुमारे 30-40 धावा वाचल्या. (हे देखील वाचा: PM Modi In Stadium: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेडियममध्ये जाऊन घेतला भारत ऑस्ट्रेलिया फायनल सामन्याचा आनंद)
ट्रॅव्हिस हेडची जबरदस्त फलंदाजी
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट सुरुवातीलाच पडल्या होत्या. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने सावधपणे खेळण्यास सुरुवात केली आणि मार्नस लॅबुशेनसह मोठी आणि सामना जिंकणारी भागीदारी केली. ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले.
सामन्याचा लेखाजोखा
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला निर्धारित 50 षटकात 240 धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या एका षटकात तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी करत नाबाद धावा केल्या. जसप्रीत बुमराहने टीम इंडियाकडून सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.