IND vs AFG T20 WC 2024 Super 8: सुपर 8 फेरीत भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना बार्बाडोस येथील किंग्स्टन ओव्हल (Kensington Oval, Bridgetown, Barbados) मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत एकाही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. टीम इंडियाने (Team India) ग्रुप स्टेजमधील तीन सामने जिंकले आहेत. पावसामुळे एक सामना रद्द झाला. अफगाणिस्तानबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी तीन सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 WC 2024 Super 8 Live Streaming Online: भारतासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, सुपर 8 सामना मोफत पाहायचा असेल तर करावे लागेल हे काम)
टी-20 विश्वचषकात IND vs AFG चौथ्यांदा येणार आमनेसामने
याआधी टी-20 विश्वचषकात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन वेळा सामना झाला आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. यावेळी चौथ्यांदा दोन्ही देशांदरम्यान सामना होत आहे. 2010 च्या टी-20 विश्वचषकातही भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यातही टीम इंडियाने बाजी मारली होती.
Barbados 🏝️ 👋
First match in the Super 8 for #TeamIndia! 🙌
ARE YOU READY❓#T20WorldCup | #AFGvIND pic.twitter.com/P9jur25zax
— BCCI (@BCCI) June 20, 2024
आकडेवारीत भारताचा वरचष्मा
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 फॉरमॅटमध्ये 8 सामने झाले आहेत. यापैकी टीम इंडियाने सात सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात निकाल लागला नाही. अफगाणिस्तानला भारतात टी-20 मालिकेतही पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भारताला अफगाणिस्तानपासून सावध राहण्याची गरज
अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या संघाने न्यूझीलंडचाही पराभव केला होता. याशिवाय संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनाही सीपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला अफगाणिस्तान संघासोबत सावध राहण्याची गरज आहे.